Dr.Paulbudhe School: डॉ.पाउलबुधे विद्यालयात कर्तव्य फौंडेशनतर्फे वह्या वाटप
Dr.Paulbudhe School: अहमदनगर (प्रतिनिधी) – काल घडलेले विद्यार्थी आज शाळेत असलेल्या विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात. विद्यार्थी कितीही मोठा झाला तरी तो शिक्षकांना विसरु शकत नाही; एकवेळ शिक्षक विद्यार्थ्यांना विसरतील पण शिष्य हा गुरुंना कधीच विसरु शकत नाही, असे प्रतिपादन उद्योजक संतोष गावडे यांनी केले.
वसंत टेकडी येथील डॉ.ना.ज.पाउलबुधे माध्यमिक विद्यालयात कर्तव्य फौंडेशनच्यावतीने गरीब, होतकरु विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी उद्योजक संतोष गावडे, आकाश बरबडे, आकाश पवार, करण कर्डिले, साहिल पठाण, प्राचार्य भरत बिडवे, आशा गावडे आदिंसह विद्यार्थी उपस्थित होते.
श्री.गावडे पुढे म्हणाले, काल ज्या शाळेत शिक्षण घेऊन आम्ही बाहेर पडलो आज कोण उद्योजक, व्यापारी, अधिकारी अशा पदावर काम करत आहेत. गुरुपौर्णिमेला मात्र न विसरता शाळेत येऊन गुरुजनांचा सन्मान करून आज येथे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन होत असलेली सेवा मनाला समाधान देते असे ते म्हणाले.
कर्तव्य फौंडेशनचे आकाश पवार म्हणाले, ज्या शाळेत आम्ही शिकलो, शिक्षकांनी आम्हाला घडविले त्या शाळेविषयी मनातून कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय. या निमित्त शालेय साहित्य देऊन विद्यार्थ्यांना शिकण्याची प्रेरणा मिळावी हा उद्देश आम्ही सफल करतो.
यावेळी करण कर्डिले, आकाश बरबडे, साहिल पठाण आदिंनी कर्तव्य फौंडेशनचच्या माध्यमातून शैक्षणिक मदतीसाठी आम्ही पुढे असतो. गुरुविषयी असलेला आदरभाव यानिमित्ताने आम्ही व्यक्त करतो. असे सांगितले.
प्राचार्य बिडवे म्हणाले शाळे विषयी माजी विद्यार्थी जी निःस्वार्थ पणे मदतीचा हात देतात ही प्रेरणा सर्वांनी घ्यावी. कर्तव्य फाउंडेशन चे नावं त्यांच्या कार्याला साजेल असे असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक परदेशी यांनी केले तर महेंद्र थिटे यांनी आभार मानले.