
Dr Strike Nagar | शासनाने तातडीने यावर निर्णय घेउन हा GR रद्द करावा अशी डॉक्टरांची मागणी
Dr Strike Nagar | नगर : दर्शक । महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये CCMP उत्तीर्ण होमिओपॅथी डॉक्टरांची नोंदणी करण्या यावी असा महाराष्ट्र शासनाने GR पारित केला असून त्यावर अमलबजावणी करण्यात यावी असा आदेश पारित करण्यात आला आहे परंतु हा निर्णय आरोग्य सेवा व्यवस्थेच्या सुरक्षितत्तेसाठी आणि आरोग्य गुणवतेसाठी हानिकारक असा निर्णय असून शासनाने तातडीने यावर निर्णय घेउन हा GR रद्द करावा अशी डॉक्टरांची मागणी असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य डॉ निसार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ चंद्रवर्धन मिश्रा यांनी म्हंटले कि आज आम्ही २४ तासांचे राज्यभर लाक्षणिक संप करीत असून आमची मागणी मान्य न झाल्यास आम्ही आंदोलन आणखी तीव्र करू आणि पुढे जरांगे पाटील पद्धतीने आंदोलन करणार त्यामुळे शासनाने याकडे गांभीर्यने लक्ष द्यावे असे ते म्हणाले.
महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये CCMP उत्तीर्ण होमिओपॅथी डॉक्टरांची नोंदणी करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याबाबत तातडीचे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आले आहे
महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषध द्रव्ये विभागाने नुकत्याच जारी केलेल्या परिपत्रकात महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलला सीसीएमपी कोर्स पास केलेल्या होमिओपॅथिक वैद्यकीय व्यवसायिकांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल मधे नोंदणी करून घेण्यासाठी निर्देश देण्यात आलेले आहेत.
हा निर्णय आरोग्य सेवा व्यवस्थेच्या सुरक्षिततेसाठी व गुणवत्तेसाठी गंभीर धोका निर्माण करणारा असल्याचे या डॉक्टरांचे म्हणणे आहे त्यांनी याची कारणे पुढील प्रमाणे दिली आहेत
- शैक्षणिक असमानता:
- MBBS अभ्यासक्रम 5.5 वर्षांचा असून त्यात 19 विषयांचा परिपूर्ण अभ्यास, अत्यंत सखोल क्लिनिकल अनुभव व एक वर्षाची अनिवार्य इंटर्नशिप असते.
- CCMP फक्त 1 वर्षाचा कोर्स असून, आठवड्यातून 2 दिवस शिकवला जातो, ज्यातून आधुनिक वैद्यकीय शास्त्रातील आवश्यक ज्ञान, कौशल्ये व निर्णयक्षमता विकसित होणे शक्य नाही.
- रुग्ण सुरक्षिततेवर धोका:
अपूर्ण प्रशिक्षण असलेल्या व्यक्तींनी रुग्णांना उपचार केल्याने चुकीचे निदान, दुष्परिणाम, अँटीबायोटिक रेसिस्टन्स आणि रुग्ण मृत्यू होण्याची शक्यता वाढते, विशेषतः ग्रामीण भागात. - दुहेरी प्रणालीचा धोका:
·MMC ही संस्था पूर्णपणे फक्त प्रशिक्षित व पात्र MBBS डॉक्टरांची नोंदणी करण्यासाठी आहे.
- CCMP डॉक्टरांची नोंदणी केल्यास दुहेरी प्रणाली निर्माण होईल व जनतेत संभ्रम, गैरसमज व अविश्वास वाढेल.
- कायदेशीर व नैतिक मुद्दे:
•राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC) व राज्य वैद्यकीय परिषदांचे नियम स्पष्ट आहेत: आधुनिक औषधोपचाराचा परवाना फक्त MBBS व त्यानंतरच्या पात्रतेसाठी आहे. • CCMP हा फक्त orientation स्वरूपाचा कोर्स असून, त्याद्वारे अलोपॅथीचे परवाने देणे कायदेशीरदृष्ट्या अयोग्य आहे. - आंतरराष्ट्रीय दर्जा घसरण्याचा धोका :
- जगभरात MBBS हा एकमेव मान्यताप्राप्त मानक अभ्यासक्रम मानला जातो. • CCMP आधारित नोंदणीमुळे राज्याच्या वैद्यकीय शिक्षणाचा व आरोग्यसेवेचा आंतरराष्ट्रीय दर्जा घटण्याची शक्यता आहे. असे आयएमए च्या डॉक्टरांचे म्हणणे आहे
