Wednesday, November 19, 2025
HomeAhmednagarDr. Vikhe Patil College | आरोग्य साक्षरतामुळे मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते -...

Dr. Vikhe Patil College | आरोग्य साक्षरतामुळे मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते – डॉ.सुवर्णा गणवीर


 Dr. Vikhe Patil College | आरोग्य साक्षरतामुळे मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते – डॉ.सुवर्णा गणवीर

Dr. Vikhe Patil College | आरोग्य साक्षरतामुळे मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते - डॉ.सुवर्णा गणवीर


नगर : दर्शक । १९ नोव्हेंबर २०२५ । 

यंदाचा जागतिक मधुमेह दिन आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात मधुमेह या थीमनुसार साजरा करण्यात आला. मधुमेह लहान मुले, प्रौढ तसेच जेष्ठ नागरिक अशा सर्व वयोगटांमध्ये दिसून येत असल्याने आरोग्य साक्षरता मजबूत करणे ही काळाची गरज असल्याचे तज्ञांनी स्पष्ट केले.        

     विळद घाट येथे डॉ. विखे पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे जागतिक मधुमेह दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी संपन्न झाली यावेळी नवी दिल्ली येथील धर्मा फाउंडेशनचे समन्वयक एचओडी डॉ. सुवर्णा गणवीर,प्राचार्य श्याम गणवीर, सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर प्रज्ञा दुमोरे  उपस्थित होते. या सर्वांनी आलेल्या रुग्णांना, विद्यार्थ्यांना मधुमेहा बाबत सखोल माहिती दिली.

           आरोग्य साक्षरता म्हणजे मधुमेहाशी संबंधित माहिती समजून घेणे, योग्य निर्णय घेणे आणि जीवनशैलीत सकारात्मक बदल करणे. निरोगी आहार, नियमित व्यायाम, वजन नियंत्रण आणि तंबाखूचे वर्जन या गोष्टी टाइप 2 मधुमेह कमी करण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. मात्र अनेक रुग्णांना आजही तपासण्यांची माहिती, औषधांचे पालन आणि स्थितीचे निरीक्षण या बाबींमध्ये अडचणी जाणवत आहेत.    

            

     अहिल्यानगरातील आरोग्य जनजागृती कार्यात सक्रिय असलेल्या डॉ.सुवर्णा गणवीर यांनी सांगितले की, मधुमेह कोणत्याही वयात होऊ शकतो. त्यामुळे लवकर शिक्षण, नियमित तपासणी, रक्तातील साखरेचे निरीक्षण, आहार आणि गतिविधीचे नियोजन याबाबत सर्वांना स्पष्ट माहिती मिळणे अत्यंत गरजेचे आहे. आरोग्य साक्षरता मजबूत झाली तर गुंतागुंत कमी होते आणि रुग्ण अधिक सक्षम बनतो.

     या निमित्ताने डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या सहाय्यक प्रा. डॉ.प्रज्ञा दुमोरे यांनी सांगितले की, मधुमेहाबद्दल योग्य माहिती, लवकर निदान आणि वेळेवर उपचार हे चांगल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. समाजात जागरुकता वाढली तर मधुमेहाचे आव्हान मोठ्या प्रमाणात कमी होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

      जागतिक मधुमेह दिनानिमित्त दोन्ही डॉक्टरांनी नागरिकांना नियमित तपासणी, निरोगी आहार, व्यायाम आणि तंबाखूमुक्त जीवन याचे पालन करावे, असे आवाहन केले. यावेळी डॉ. श्याम गणवीर यांनी सर्व उपस्थित प्राध्यापक, डॉक्टर, विद्यार्थी यांचा सन्मान करून आभार मानले.   



RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments