Dr Vikhe Patil College | डॉ.विखे पाटील अभियांत्रिकीत इलेक्ट्रीकल इंजिनीअरिंग विभागात ‘डिझाईन अस्पेक्टस् अँड इम्पॅक्ट ऑफ स्टॅटिस्टिकल टूल्स’ विषयावरिल व्याख्यानास प्रतिसाद

Dr Vikhe Patil College | नगर : दर्शक ।
विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रीकल इंजिनीअरिंग विभागात “डिझाईन अस्पेक्टस् अँड इम्पॅक्ट ऑफ स्टॅटिस्टिकल टूल्स” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानासाठी प्रमुख वक्ते म्हणून इंजि. प्रदीप जाधव, डेप्युटी जनरल मॅनेजर तसेच इंजि. पुरुषोत्तम नांदगावकर, सीनियर मॅनेजर – रिसर्च अँड डेव्हलपमेंट, स्नायडर इलेक्ट्रिक, नगर हे उपस्थित होते.
या व्याख्यानात उत्पादन क्षेत्रातील आधुनिक डिझाईन प्रक्रियेचे महत्व, गुणवत्तावृद्धीसाठी स्टॅटिस्टिकल टूल्सचा उपयोग आणि ग्राहकाभिमुख उत्पादन विकसित करण्याच्या तांत्रिक पद्धती याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये तयार होणाऱ्या उत्पादनांचे डिझाईन सुधारून कमी खर्चात उत्कृष्ट दर्जाचे प्रॉडक्ट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्व यावर विशेष भर देण्यात आला. या कार्यक्रमाला विद्युत विभागातील द्वितीय ते चतुर्थ वर्षातील जवळपास १५० विद्यार्थी उत्स्फूर्तपणे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन प्रा.डॉ.एस.के.शेख यांनी केले होते.
या व्याख्यानात आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनात इंजि. प्रदीप जाधव म्हणाले,आजच्या काळात तंत्रज्ञानाचा वेग इतका प्रचंड आहे की, प्रत्येक अभियंता विद्यार्थ्याने उद्योगविश्वाच्या प्रत्यक्ष गरजा समजून घेतल्या पाहिजेत. फक्त डिझाईन करणे पुरेसे नाही, तर त्या डिझाईनला व्यवहार्य स्वरूप देऊन ते बाजारपेठेत यशस्वी करणे महत्त्वाचे आहे. यासाठी स्टॅटिस्टिकल टूल्स अभियंत्यांना दिशा दाखवतात.
ते पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमापुरते न राहता संशोधन व उद्योगातील वास्तवाशी नाळ जोडली पाहिजे. कमी खर्चात उच्च दर्जाचे उत्पादन तयार करणे हीच खरी कौशल्यपूर्ण अभियंतिकी आहे. या क्षेत्रात भारताला जागतिक पातळीवर मोठी संधी आहे, ती साधण्यासाठी तरुण अभियंते सक्षमतेने पुढे सरसावले पाहिजेत.
या प्रसंगी विभागप्रमुख डॉ. अजित लावरे यांनी पाहुण्यांचा सत्कार केला व आभार व्यक्त केले. संस्थेचे प्राचार्य डॉ.रविंद्र नवथर यांनी अशा महत्वाच्या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केल्याबद्दल विभागाचे कौतुक केले. या उपक्रमासाठी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनचे डायरेक्टर जनरल डॉ.पी.एम. गायकवाड, डायरेक्टर टेक्निकल प्रा. सुनिल कल्हापुरे यांचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाचे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माजी खा.डॉ.सुजय विखे पाटील तसेच महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी कौतुक केले.
