Drawing Competition | रचना कला महाविद्यालयात चित्रकला स्पर्धा उत्साहात साजरी

 रचना कला महाविद्यालयाच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य चित्रकला स्पर्धा उत्साहात साजरी १३५० विद्यार्थ्यांचा सहभाग


Drawing Competition | रचना कला महाविद्यालयात चित्रकला स्पर्धा उत्साहात साजरी


अहमदनगर । दर्शक : 

 दिवंगत चित्रकार ए.जी. शेकटकर संस्थापक असलेल्या रचना कला महाविद्यालयाचा २६ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापनदिनानिमित्त शालेय विद्यार्थी, पालक व ज्येष्ठ नागरिकांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत १३५० विद्यार्थी सहभागी झाले.



त्याचबरोबर शासकिय चित्रकला (इलीमेंटरी, इंटरमिजीएट) ड्रॉईंग ग्रेड परिक्षेसाठी उपयुक्त असे स्मरणचित्र, वस्तुचित्र व संकल्पचित्र या विषयावरील चित्रकार कै.ए.जी.शेकटकर यांनी रेखाटलेल्या चित्रांचे चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले. स्पर्धा व प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी आजी माजी विद्यार्थी व पालक प्रतिनिधी यांनी सहकार्य केले.



स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी ता.८ सप्टेंबर २०२४ रोजी रचना कला महाविद्यालय, सांगळेगल्ली, अहमदनगर, येथे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती महाविद्यालयाच्या संचालिका वर्षा शेकटकर व प्राचार्या जबिन शेख यांनी दिली.