Elon Musk | एलॉन मस्कनं ट्विटरचा X केला आणि आता हा एक्स विकून पुन्हा जगाला धक्काच दिला

Elon Musk | एलॉन मस्कनं ट्विटरचा X केला आणि आता हा एक्स विकून पुन्हा जगाला धक्काच दिला

Elon Musk: एलॉन मस्क यानं कायमच संपूर्ण जगाला कोणत्या न कोणत्या क्रमाने आणि कारणाने धक्का देण्याच त्याच स्वभाव आहेच यात भर म्हणून एलॉन मस्कनं आता एक मोठा व्यवहार करत त्याच्या X या कंपनीची मालकी विकल्याचं सोशल मीडियावर जाहीर केलं.ट्वीटर या जगप्रसिद्ध ब्रॅण्डला अचानक खरेदी करून जगाला धक्का दिला आणि त्यानंतर उगाच काहीतरी बदल करत दररोज काहीनाकाही बदल तो करत असे यात इतके बदल केले आणि अचानक ट्विटरचा लोगो बदलला आणि अचानक एक अजून धक्का नावच बदलून ट्विटर चा x केला आणि आता हा एक्स विकून पुन्हा जगाला धक्काच दिला नव्या खरेदीदाराने पुन्हा x ला ट्विटर नाव दिल्यास धक्का बसणार नाही

X ची मालकी विकत एलॉन मस्कनं तब्बल 33 अब्ज डॉलर इतका मोठा व्यवहार केला असून, यातून त्याला चांगलाच नफा झाल्याचं म्हटलं जात आहे. मस्कनं काही महिन्यांपूर्वीच X ची खरेदी 44 अब्ज डॉलर किमतीला केली होती. खरेदी आणि विक्रीच्या फरकामध्ये प्रथमदर्शनी मस्कला तोटा झाल्याचं लक्षात येत असलं तरीही दरम्यानच्या काळात  जाहिराती आणि X च्या इतर काही धोरणांच्या माध्यमातून त्यानं चांगली कमाई करत खर्च केलेली रक्कम वसूल केल्याची शक्यता नाकारता येत नाही असंच मत जागतिक स्तरावरील काही जाणकारांनी मांडलं. 

मस्कनं या मोठ्या व्यवहाराविषयीची माहिती देताना एक पोस्ट करत त्यामध्ये लिहिलं, ‘xAI आणि X एकमेकांशी संलग्न असून डेटा, मॉडल, कम्यूटिंग, टॅलेंट, डिस्ट्रीब्यूशन या क्षेत्रात त्यानं झपाट्यानं प्रगती केली आहे’. या व्यवहारातून xAI ची अद्ययावत एआय क्षमता आणि X ची व्याप्ती एकत्र येत एक दर्जेदार प्रोडक्ट यातून जगापुढं येणार असल्याचं मस्कनं स्पष्ट केलं. 

@xAI has acquired @X in an all-stock transaction. The combination values xAI at $80 billion and X at $33 billion ($45B less $12B debt).

Since its founding two years ago, xAI has rapidly become one of the leading AI labs in the world, building models and data centers at…

— Elon Musk (@elonmusk) March 28, 2025

मस्ककडे याआधीच स्पेस एक्स आणि टेस्ला या दोन बड्या कंपन्यांची मालकी

मस्ककडे याआधीच स्पेस एक्स आणि टेस्ला या दोन बड्या कंपन्यांची मालकी असून, हल्लीच त्याच्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागारपदाची धुरा सोपवण्यात आली. मस्कच्या श्रीमंतीत दर दिवशी भर पडत असतानाच त्याचं X मध्ये असणारं योगदान जगभरात चर्चेचा विषय ठरलं.