Food Festival Nagar | झायका फूड फेस्टिवल 2026 अंतर्गत ” 90 बॉलीवूड” या संकल्पनेवर नगरकरांसाठी स्वादिष्ट मेजवानीचे आयोजन
Food Festival Nagar | नगर : दर्शक । जिल्हा मराठा विद्या प्रसारक हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयामध्ये सालाबाद प्रमाणे फूड फेस्टिवल चे यावर्षीही उत्साहात आयोजन करण्यात आले. सदर महाविद्यालय अहलियानगर शहर परिसरामध्ये पंचतारांकित खाद्यसंस्कृतीमधील नवोपक्रम या फेस्टिवलच्या माध्यमातून रुजवण्याचे कार्य गेल्या पंचवीस वर्षापासून करत आहे. अहलियानगर शहर व जिल्ह्यातील खाद्य प्रेमींसाठी हा फेस्टिवल म्हणजे एक पर्वणीच असते.
फूड फेस्टिवल 2026 चे उद्घाटन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या खजिनदार ॲड.दीपलक्ष्मी म्हसे यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रामचंद्रजी दरे, सहसचिव मुकेशदादा मुळे, कार्यकारिणी सदस्य दीपक दरे, महाविद्यालयाचे संचालक डॉ. नंदकुमार जगताप, प्राचार्य योगिता सदरे, फेस्टिवलचे समन्वयक प्रा. बाळासाहेब शेंडगे, अंतर्गत गुणवत्ता कक्ष समन्वयक प्रा. गोकुळ सोनावणे व सर्व प्राध्यापक वृंद उपस्थित होते.
प्रत्येक वर्षी या फेस्टिवलचे आयोजन हे विविध थीमवर थीमनुसार असते. यावर्षी बॉलिवूड या थीमनुसार 90 च्या दशकातील विविध चित्रपट व सीने तारे यांचे फोटोग्राफ्स, पोस्टर्स व विविध बॅनर्स ने आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती व पाहुण्यांच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांनी विविध तारे तारकांचा पोशाख परिधान केलेला होता. बॉलीवूड मधील झगमगाट करून आकर्षक असे वातावरण निर्माण करण्यात आले होते.
छायाचित्रे, पोस्टर्स, कट आउट वापरून छान डेकोरेशन करण्यात आले. पाहुण्यांसाठी रुचकर मेन्यू होता. यामध्ये स्वागत पेय गुप्त किवी मॅजिक मॉकटेल, स्टार्टर्स मध्ये जॉनी चाट कॉर्नर, बॉबीज चीज कॉन, जिद्दी फिश फिंगर, सूप मध्ये हीरो नंबर वन, मेन कोर्स मध्ये बादशहास पनीर टिक्का, व्हेज का अंदाज अपना अपना, फुल और काटे मटन, फिल्मी रोटी, नवाबो का पुलाव, डॉन कि मटण दम बिर्याणी, दिल से ग्रीन सलाड, खूबसूरत फ्रुट सलाड, बाजीगर पापड चाट रंगीला सलाड आणि मिठाई मध्ये ऑरेंज अँड चॉकलेट आशिकी, दिवाना रोल्स, धकधक आईस्क्रीम या व्यंजनांची रेलचेल होती.
नगरकरांनी ही सर्व स्वादिष्ट व्यंजने चाखून खूप सकारात्मक प्रतिसाद दिला व अशा प्रकारचे कार्यक्रम महाविद्यालयाने सातत्याने राबविण्यात यावे अशी इच्छा व्यक्त केली. या फेस्टिवलचे आयोजन अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक शिक्षिका प्राचार्य संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे फूड अँड बेवरेज प्रोडक्शन, फुड अँड बेवरेज सर्विस, फ्रंट ऑफिस ऑपरेशन्स, हाउसकीपिंग, मार्केटिंग इत्यादी विभागामध्ये नेमणूक करून त्यांना प्रा. योगिता सदरे, प्रा. बाळासाहेब शेंडगे, प्रा. गोकुळ सोनावणे, प्रा. सागर माळवदे, प्रा. वाहिद मणियार, प्रा. रचना खटावकर यांनी मार्गदर्शन केले.
.webp)