Fraud Crime Ahmednagar: नोकरदाराची २४ लाख २५ हजार रूपयांची फसवणूक
Fraud Crime Ahmednagar: अहमदनगर । अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका खासगी नोकरदाराची २४ लाख २५ हजार रूपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी (दि.२६) सायंकाळी येथील सायबर पोलीस ठाण्यात व्हॉट्सअॅप नंबर धारक रजतसिंग रजपुत नामक व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त: सुडके मळा, बालिकाश्रम रस्ता येथे राहणाऱ्या खासगी नोकरदाराच्या फिर्यादीनुसार, ६ जानेवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान त्यांना एका व्हॉट्सअॅप नंबरवरून रजतसिंग रजपूत नामक व्यक्तीने संपर्क केला. शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले.
रजपूत याने फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांनी देखील रजपुत याच्यावर विश्वास ठेऊन त्याला ट्रेडिंगसाठी वेळोवेळी पैसे दिले. त्यांनी ६ जानेवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान एकूण २४ लाख २५ हजार रूपये दिले.
दरम्यान, रजपुत याने फिर्यादी यांना ट्रेडिंगमधील नफा दिला नाही. त्याला वेळोवेळी संपर्क करून देखील त्याने प्रतिसाद दिला नाही. आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादी यांच्या लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी येथील सायबर पोलीस ठाणे गाठून पोलिसांना माहिती दिली.