Fraud Crime: जादा नफा,१६० टक्के परतावा असे आमिष डॉक्टरांना दाखवून महिलेने लावला ४७ लाखांचा चुना

Fraud Crime: जादा नफा,१६० टक्के परतावा असे आमिष डॉक्टरांना दाखवून महिलेने लावला ४७ लाखांचा चुना  

Fraud Crime: जादा नफा,१६० टक्के परतावा असे आमिष डॉक्टरांना दाखवून महिलेने लावला चुना





अहमदनगर ( प्रतिनिधी ): जादा नफा दाम दुप्पट दुसऱ्या दिवशी करोडपती लगेच होणार करोडपती उद्या सकाळी लखपती आज गुंतवणूक आणि उद्या फसवणूक त्यामुळे सावधान रहा सतर्क रहा एका दिवसात आणि महिनाभरात करोडपती लखपती होता येत नाही त्यामुळे अशा आमिषांना बळी पडू नका शेअर ट्रेडिंग मध्ये लाखोंचा फायदा होण्याचे आमिष दाखवून डॉक्टर विजय नामदेव गाडे वय 42 पाईपलाईन रोड सावेडी येथे राहणारे डॉक्टर गाडे यांची एकूण 47 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली.


 नुकतेच अहमदनगर सायबर पोलीस ठाण्यात त्यांनी फिर्याद दाखल केली सायबर सेल अहमदनगर पोलिसांनी आय सी ग्रुप गोल्ड स्टॉक क्लब या व्हाट्सअप ग्रुप मधील अनिका शर्मा  महिले विरोधात गुन्हा दाखल केला आहे.


 नेवासा फाटा येथे डॉक्टर गाडे यांचे हॉस्पिटल असून अहमदनगर मध्ये ते कुटुंबासह राहतात फेसबुक वर शेअर ट्रेडिंग कसे करावे व शेअर ट्रेडिंग मध्ये नफा कसा मिळवायचा याबाबत जाहिरात पाहून सदर जाहिरातीवर क्लिक केल्यावर व्हाट्सअप ग्रुप ची लिंक आली व त्यावर त्यांनी क्लिक केल्यानंतर त्यांचा नंबर आयसी ग्रुप गोल्ड स्टॉक क्लब या व्हाट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट झाला.


 ग्रुप ॲडमिन आणि का शर्माहीने डॉक्टर गाडे यांना संपर्क केला आणि अशा प्रकारे या फसवणुकीची सुरुवात झाली ट्रेडिंग ची माहिती सावकाशपणे हळूहळू आणि व्यवस्थितपणे लाडागोडीने सांगत पूर्णतः शंका दूर करत आम्ही सांगतो त्याप्रमाणे गुंतवणूक केली तर तुम्हाला कित्येक पटीने परतावा मिळेल असे सांगून डॉक्टर गाडे यांचा विश्वास संपादन केला त्यानंतर तिने सांगितल्याप्रमाणे डॉक्टर गाढे यांनी रक्कम भरली त्यानंतर  डॉक्टर गाडे यांनी  अनिका शर्मा ला गुंतवणूक केलेल्या रकमेचा परतावा मिळण्यासाठी विचारणा केली असता तिने तिने सांगितले की तुम्हाला आयपीओ मध्ये बंपर धमाका लॉटरी लागली आहे


 तुम्ही अधिक पैशांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला 150 ते 160% इतका मोठा भर भक्कम भरघोस नफा आणि परतावा मिळेल असे आम्हीच दिले त्यामुळे डॉक्टर गाडे यांनी पुन्हा 11 जुलै रोजी आरटीजीएस द्वारे रक्कम पाठवली त्यानंतर डॉक्टर गाडे यांनी शर्मा हिला पैशाची मागणी केली असता फसवणूक करणारी आणि का शर्माने त्यांना सांगितले की तुम्ही आणखी 40 लाख भरा नाहीतर तुमचे अकाउंट फ्रिज होईल आणि तुम्हाला कोणताही पैसा किंवा मोबदला आणि नफा मिळेल परत मिळणार नाही अशी भीती दाखविली


परतावा रक्कम नफा आणि मुद्दल पैसे देण्या ऐवजी पुन्हा पैशाची मागणी केल्यानंतर डॉक्टर गाडे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि त्यांनी सायबर पोलिसात फिर्याद दाखल केली पुढील तपास सायबर सेल पोलिस अहमदनगर करीत आहे.

 सर्व नागरिकांनी नगरकरांनी अहमदनगर शहर जिल्हा महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने अशा आमिषाला बळी न पडता आपल्या मेहनती कष्टाने पुढे जाऊन नफाही कमावता येतो आणि मोबदलाही कष्टाचा मिळतो त्यामुळे सतर्क रहा सावधान रहा हीच आपल्या सर्वांकडून दर्शक न्यूजची अपेक्षा