Fraud Crime | दहा टक्के परतावा देण्याच्या आमिषाने युवकाला ४ लाखाचा गंडा

 Fraud Crime | दहा टक्के परतावा देण्याच्या आमिषाने युवकाला ४ लाखाचा गंडा

Fraud Crime | दहा टक्के परतावा देण्याच्या आमिषाने युवकाला ४ लाखाचा गंडा

  



नगर ।  दर्शक  –

मागील काही  महिन्यांपासून नगर शहरात सुरू आहेत चुना लावण्याचे आणि गंडा घालण्याचे प्रकार आणि नगरकर खोट्या आमिषांना बळी पडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. दाम दुप्पट योजना, गुटखा, बेसन ,कांदा आणि असेच काहीतरी शेयर्स आणि घोटाळे राजरोस होत असून घोटाळेबाज घोटाळा करण्यात पारंगत आहेत आणि नगरकर अमिषाला बळी पडण्यात अग्रेसर असल्याचे दिसते त्यामुळे या भूलथापांना बळी पडू नका आणि आपल्या कष्टाचे मेहनतीची रक्कम या भुरट्या चोरट्यांकडे देऊ नका सतर्क रहा सावधान रहा आपली आणि कुटुंबीयांची काळजी घ्या आणि रक्कम १० दिवसात दुप्पट, एका महिन्यात तिप्पट आणि २ महिन्यात करोडपती असे होत नाही. कष्ट करत रहा आणि यशस्वी व्हा कष्टाच्या बळावर यश नकी मिळेल फक्त धीर ठेवा. 

गुन्हा दाखल झालेल्या या आजच्या गुन्ह्याची माहिती पुढीलप्रमाणे 

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास 10 टक्के परतावा देण्याच्या आमिषाने एका युवकाची चार लाख रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रेमराज धोंडीभाऊ कुनगर (वय 22 रा. टाकळी लोणार, ता. श्रीगोंदा, हल्ली रा. यशवंत कॉलनी, नगर- सोलापूर रस्ता,नगर) असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे.

दरम्यान, कुनगर यांनी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात तक्रार दखल केली होती. त्या तक्रारीवरून अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एस. लोणे यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर कुनगर यांच्या फिर्यादीवरून सोमवारी (18 नोव्हेंबर) नगर तालुका पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूषण दिपेश देशमुख (रा. लक्ष्मी संकुल, भुषण कॉलनी, एमजी कॉलेजच्या पाठीमागे, ता. जि. जळगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

सदरची घटना 11 सप्टेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 दरम्यान घडली आहे. फिर्यादी हे शिक्षण घेतात. ते सप्टेंबर 2022 ते डिसेंबर 2022 दरम्यान नगर तालुक्यातील साकत खुर्द व अहिल्यानगर शहरातील अहमदनगर कॉलेजमध्ये असताना त्यांनी संशयित आरोपीकडे शेअर मार्केटसाठी गुंतवणूक केली होती. त्याने गुंतवणूकीवर 10 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. फिर्यादी यांनी संशयित आरोपीला युपीआय मार्फत चार लाख रूपये पाठविले होते. दरम्यान, संशयित आरोपीने फिर्यादीला मोबदला न देता त्यांची फसवणूक केली.

याविरूध्द फिर्यादीने न्यायालयात तक्रार दाखल केली. तेथे त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार लबडे करत आहेत.