Ganj Bazar | शिवमित्र प्रतिष्ठानचा गणेशोत्सवात आमटी भाकरीचा महाप्रसाद

Ganj Bazar | नगर : दर्शक ।
येथील गांजेगल्ली,गंजबाजारमधील शिवमित्र प्रतिष्ठानने आज सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षी हि सत्यनारायण महापूजा आयोजित केली होती. त्यानिमित्त सर्वासाठी आगडगाव येथील सुप्रसिध्द आमटी,भाकरी ठेचा,शिरा या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.त्याचा लाभ सुमारे ३००० भाविकांनी घेतला.
यावेळी मंडळाचे मंडळाचे अध्यक्ष संकेत संजय गुरव व सर्व पदाधिकारी व मित्र परिवार तसेच मंडळाचे सल्लागार प्रशांत मुथा, भाजपाचे उपाध्यक्ष गोपाल वर्मा, चेतन कांकरिया, प्रणय दळवी, प्रकाश मुथा , अभय बोरा, सुभाष आनिचा, सागर गुरव, गणेश कांकरिया आदी उपस्थित होते.
सर्व कार्यकर्त्यांनी भोजन वाढण्यास मदत केली व सर्व कामे केली
