
Health Camp Nagar | नियमित आरोग्य तपासणी केल्यास गंभीर आजार टाळता येतात – डॉ. अशफाक पटेल
Health Camp Nagar | नगर : दर्शक – आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्य हेच खरे धन आहे. मधुमेह, हृदयविकार, थायरॉईड अशा अनेक आजारांची वेळेत तपासणी न झाल्यास त्यांचे गंभीर परिणाम दिसून येतात. त्यामुळे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता वेळोवेळी तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे.आमचे ध्येय केवळ उपचार देणे नाही, तर समाजात आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे हे देखील आहे.
पैगंबरांच्या शिकवणीनुसार इतरांची सेवा करणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हेच खरे इबादत आहे.आजच्या शिबिराला मिळालेला प्रतिसाद आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करत राहू. असे प्रतिपादन डायबेटोलॉजिस्ट व हृदयरोग विकार तज्ञ डॉ.अशफाक पटेल यांनी केले.
पैगंबर जयंतीच्या औचित्याने पटेल स्पेशालिटी क्लिनिक यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात रुग्णांना विविध आजारांवरील तपासण्या मोफत करून देण्यात आल्या. विशेषतः रक्तातील थायरॉईड, तीन महिन्यातील साखर (एचडी वन सी), कोलेस्टेरॉल, रक्तातील साखर इत्यादी महत्त्वपूर्ण तपासण्या रुग्णांना विनामूल्य करून देण्यात आल्या.
या प्रसंगी डायबेटोलॉजिस्ट व हृदयरोग तज्ञ डॉ. अशफाक पटेल यांच्यासह प्रकाश मुनोत, तुषार वर्पे, आकाश हिवाळे, विक्रम मार्कंड, हर्षल मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिराचा लाभ मोठ्या संख्येने रुग्णांनी घेतला. नियमित आरोग्य तपासणी केल्यास गंभीर आजार टाळता येतात, याबाबत जनजागृतीही करण्यात आली. वारंवार अशा उपक्रमांचे आयोजन केल्यामुळे रुग्णांनी समाधान व्यक्त करून डॉ. अशफाक पटेल व पटेल स्पेशालिटी क्लिनिकचे आभार मानले.
