Wednesday, November 19, 2025
HomeAhmednagarHealth Camp Nagar | भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सवानिमित्त आरोग्य शिबिर संपन्न 

Health Camp Nagar | भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सवानिमित्त आरोग्य शिबिर संपन्न 

Health Camp Nagar | भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सवानिमित्त आरोग्य शिबिर संपन्न 

 

 

 

Health Camp Nagar | नगर : दर्शक ।

येथील स्वकुळ साळी हितसंवर्धक मंडळ, बागडपट्टी व भगवान जिव्हेश्वर मंदिर ,दिल्लीगेट पटांगण यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी , मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर , दंतरोग तपासणी शिबिर व सीबीसी व रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उदघाटन नगरच्या जीएसटी चे अधीक्षक संदीप पाठक व नोटरी पब्लिक ऍड समीर वखारे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

 

यावेळी स्वकुळ साळी हितसंवर्धक मंडळाचे विश्वस्त प्रमुख विक्रम पाठक,जिव्हेश्वर मंदिराचे अध्यक्ष संजय सागावकर,गजेंद्र सोनवणे, जितेंद्र लांडगे,डॉ.सुदर्शन गोरे, डॉ.आदित्य खडामकर,डॉ. कैलास खडामकर,डॉ.विकास दळवी,निलेश आदमाने,योगेश भागवत,राजेंद्र सवई,अँड.राहुल वरुडे,मुकुंद सावेकर,संजय दळवी,,गणेश मानकर, ,संतोष सावेकर,अनिल सावेकर,वनिता मानकर,अनिता सवई ,कल्याणी पावले,सोनाली दळवी आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

यावेळी बोलताना संदीप पाठक म्हणाले प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे आपण तंदुरुस्त आहोत कि काही प्रॉब्लेम आहे हे अशा शिभिरातून समजते प्रत्येकाने अशा तपासणी करून घेतली पाहिजे,जिव्हेश्वर जन्मोत्सव निम्मित  धार्मिक कार्यासोबतच विविध आरोग्य शिबिरे घेण्यात आली आहेत.

 

 

आरोग्य शिबिराच्या माध्यमातून समाजसेवा घडते.असे  विक्रम पाठक म्हणाले तर प्रास्ताविकात संजय सागावकर म्हणाले,जिव्हेश्वर  जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्याचे आयोजन करण्यात आले आहे.आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे देणे लागतो.याप्रमाणे सर्वांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

 

या शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला आहे.या शिबिराच्या माध्यमातून मोफत नेत्रशस्त्रक्रिया,दंत रोग तपासणी तसेच बीबीसी व रक्त तपासणी मोफत करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments