HSC Result : रुपीबाई बोरा उच्च माध्यमिक विद्यालयाचा इ.12 वी चा 100 टक्के निकाल

HSC Result : कला व शास्त्र शाखेचा 100 टक्के निकाल 

HSC Result : पीबाई बोरा उच्च माध्यमिक विद्यालयाचा  इ.12 वी चा 100 टक्के निकाल

                                                                (Photo Rutuja Ahmednagar)

     HSC Result : अहमदनगर (प्रतिनिधी)  – मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या पुणे बोर्डाच्या इ.12चा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या रुपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश स्कूल उच्च माध्यमिक विद्यालयाचा कला व शास्त्र शाखेचा 100 टक्के निकाल लागला.


     दरवर्षीप्रमाणे या वर्षीही उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी इ. 12 वी परिक्षेत सुश संपादन केले. परिक्षेस बसलेले सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये कला शाखेत अनुक्रमे प्रथम – वृषाली कांगुडे, द्वितीय – अस्मिता औटी, तृतीय – साक्षी कराळे उत्तीर्ण झाल्या. तसेच शास्त्र शाखेत अनुक्रमे प्रथम – हर्षवर्धन कोतकर, द्वितीय – ओमराज भोसले, तृतीय – सुरज मुनोत यांनी यश संपादन केले.


     कला शाखेत कु.वृषाली कांगुडे हिने सर्व विषयात प्रथम क्रमांक पटकाविला. शास्त्र शाखेतील सुरज मुनोत यांने इंग्रजी विषयात. सुरज चितळकर व स्वप्नील रकटे यांनी मराठी विषयात, सानिका सोनवणे हीने हिंदी विषयात, हर्षवर्धन कोतकर याने रसायनशास्त्र व गणित विषयात, ओमराजे भोसले याने भौतिकशास्त्र व संगणक शास्त्र विषयात, कु.श्रेया मिसाळ हीने जीवशास्त्र विषयात तर कु.गायत्री डांगे हीने भुगोल विषयात प्रथम क्रमांक पटकाविला.


     सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या प्रमुख कार्यवाह श्रीमती छायाताई फिरोदिया, सहकार्यवाह गौरव फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, खजिनदार प्रकाश गांधी, यांनी अभिनंदन केले. सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य अजयकुमार बारगळ, उपप्राचार्या श्रीमती सुवर्णा वैद्य, पर्यवेक्षिका सौ.संतोष मुथा यांचे मार्गदर्शन लाभले.