Iftar Party Nagar | इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक – इकराम काटेवाला


 Iftar Party Nagar | जमात ए इस्लामी तर्फे इफ्तार कार्यक्रम उत्साहात संपन्न

Iftar Party Nagar | इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक - इकराम काटेवाला


  Iftar Party Nagar | नगर : दर्शक । 

हातमपुरा येथील जुन्या कलेक्टर ऑफिस शेजारील कासिमखानी मस्जिद रविवारी सायंकाळी सर्व धर्म सदभावाच्या भावनेतून दावते रोजा इफ्तार कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. विविध धर्मीय बांधव मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन सावित्री फातिमा सद्भावना मंच नगर, जमात-ए-इस्लामी हिंद तसेच  स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाचा उद्देश समाजात बंधुभाव, ऐक्य व परस्पर सलोखा वाढवणे हा होता.सध्या देशात हिंदू मुस्लिम या दोन समाजात तेढ निर्माण करून तरुणांची माथी भडकावून त्यांना दंगली करण्यासाठी प्रवृत्त केलं जाण्याचा प्रयत्न होतोय. मात्र आपण आपल्या घरातील तरुणांना यापासून दूर ठेवलं पाहिजे असं वक्तव्य अनेक मान्यवराने केले. खऱ्या अर्थानं आज देशाला सावित्री – फातेमा व छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांची गरज आहे आणि तेच काम या संस्थेच्या वतीनं सुरू आहे.असे उदगार ही अनेकांनी काढले.

यावेळी डॉ. इक्राम काटेवाला आपल्या भाषणात म्हणाले की,रमजान हा आत्मशुद्धी, संयम आणि मानवतेचा संदेश देणारा पवित्र महिना असून रोजा केवळ भूक-तहान सहन करण्यासाठी नसून माणसाने आपल्या वागणुकीत चांगुलपणा, सहनशीलता आणि बंधुभाव वाढवण्यासाठी आहे.

यावेळी नगरसेवक बाळासाहेब बोराटे म्हणाले की, दावते इफ्तारसारखे कार्यक्रम समाजात प्रेम, बंधुभाव आणि एकता वाढवण्याचे काम करतात. सर्व धर्मीय लोकांनी एकत्र येऊन सण-उत्सव साजरे करणे ही आपल्या देशाची परंपरा असून अशा उपक्रमांमुळे समाजात परस्पर विश्वास आणि सलोखा अधिक दृढ होतो असे सांगितले.

पुढे संजय सपकाळ यांनी स्टुडन्ट इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया च्या विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले की, समाजात एकता आणि बंधुभाव निर्माण करण्यासाठी युवकांनी पुढाकार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सावित्री फातिमा सद्भावना मंच,नगर, जमात-ए-इस्लामी हिंद तसेच स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया च्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेला हा दावते इफ्तार कार्यक्रम सर्व धर्मीयांना एकत्र आणणारा आदर्श उपक्रम असून अशा कार्यातून समाजात सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक बाळासाहेब बोराटे,नगरसेवक शम्स खान,माजी नगरसेवक फय्याज शेख (केबलवाले) साहेबांन जहागीरदार,हरदिन मॉर्निंग ग्रुप भिंगारचे अध्यक्ष संजय सपकाळ,  सचिन चोपडा, सावित्री फातिमा विचार मंचाचे एडवोकेट बोरुडे व हरदिन मॉर्निंग ग्रुपचे सर्व सदस्य यांच्यासह शहरातील सर्व धर्मीय धर्मगुरू, राजकीय, शैक्षणिक, समाजिक क्षेत्रातील नेते, कार्यकर्ते आणि हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी दावते इफ्तार कार्यक्रमाचे कौतुक करून समाजात ऐक्य व बंधुभाव टिकवण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.

कार्यक्रमात विविध धर्मीय नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. आलेल्या सर्व धर्मीय बांधवांनी कार्यक्रमाचे कौतुक करून अशा उपक्रमांमुळे समाजात ऐक्य आणि बंधुभाव अधिक मजबूत होत असल्याची भावना व्यक्त केली. शेवटी सर्वांनी एकत्र इफ्तार करून सर्व धर्म समभाव बंधुभाव आणि एकतेचा संदेश दिला. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुश्ताक पठाण यांनी केले तर आभार प्रदर्शन फिरोज शेख यांनी मानले.

 शेवटी सर्वांनी एकत्र इफ्तार करून सर्व धर्म समभाव, बंधुभाव आणि एकतेचा संदेश दिला.

Scroll to Top