IPL 2025: प्लेऑफमध्ये डॉट बॉलच्या जागी हिरवी झाडं का दिसतात? केव्हा झाली सुरुवात? उद्देश काय?

IPL 2025: प्लेऑफमध्ये डॉट बॉलच्या जागी हिरवी झाडं का दिसतात? केव्हा झाली सुरुवात? उद्देश काय?

IPL 2025: आयपीएल 2025 च्या सामन्यांदरम्यान प्रत्येक डॉट बॉलसाठी स्कोअर ग्राफिक्सवर हिरव्या झाडांचे चिन्ह तुम्ही पाहिले असेल. पण हे काय आहे? याचा विचार कधी केलाय का? यामागे बीसीसीआय आणि टाटा ट्रस्ट यांचे उद्दीष्ट आहे. काय आहे हा प्रकार? यामुळे समाजाला कसा फायदा होणार? सविस्तर जाणून घेऊया.  

हिरव्या झाडांचे चिन्ह हे पाऊल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या हरित उपक्रमाचा एक भाग आहे. यासाठी बीसीसीआयने टाटा समूहासोबत भागीदारी केलीय. इंडियन प्रीमियर लीगमध्ये टाकल्या जाणाऱ्या प्रत्येक डॉट बॉलसाठी 500 झाडे लावण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. गेल्या 3 हंगामातही बोर्डाने असाच उपक्रम हाती घेतला होता. 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील क्वालिफायर 1 मध्ये 84 डॉट बॉल टाकले होते. ज्यानंतर 42 हजार रोपे लावण्यात आल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सामन्यानंतर ट्विटरद्वारे दिली होते. 

हरित उपक्रमाचा एक भाग म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टाटा समूहासोबत भागीदारी केली आहे आणि आयपीएलमध्ये टाकल्या जाणाऱ्या प्रत्येक डॉट बॉलसाठी 500 झाडे लावण्याचे वचन दिले आहे. गेल्या 2 हंगामातही बोर्डाने असाच उपक्रम राबवला होता.

गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये, बीसीसीआयने घोषणा केली की त्यांच्या ग्रीन इनिशिएटिव्ह अंतर्गत 4 लाख  झाड बेंगळुरूमध्ये नव्याने स्थापन झालेल्या बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे लावण्यात आले आहे.

हे पाऊल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या हरित उपक्रमाचा एक भाग आहे. बीसीसीआयने टाटा ग्रुपच्या भागीदारीत, तीन प्लेऑफ आणि अंतिम सामन्यात टाकलेल्या प्रत्येक डॉट बॉलमागे 500 हून अधिक झाडे लावण्याचे वचन दिले आहे. बीसीसीआयने आयपीएल 2023 च्या प्लेऑफपासून हा अनोखा उपक्रम सुरू केला. पर्यावरणासाठी उचललेल्या या पावलाबद्दल कळल्यानंतर चाहते भारतीय क्रिकेट बोर्डाचे कौतुक करत आहेत.