न्यू संकल्प स्मार्ट सखी आयोजित भक्तामरची अमरकथा नाटकास उत्स्फुर्त प्रतिसाद
अहमदनगर | दर्शक :
ऐतिहासिक भव्य भक्तामरची अमरकथाया नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी इचलकरंजी येथून लेखिका व दिग्दर्शिका मनाली मुनोत या शंभर कलाकारांसोबत भव्य स्टेजवर हे नाटक प्रस्तुत करण्यात आले.
अहमदनगर येथील न्यू संकल्प स्मार्ट सखी व तिलोक रत्न स्थानक वासी जैन धार्मिक परीक्षा बोर्ड आनंदधाम अहमदनगर तथा श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने या ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन केले होते. भक्तामरची अमरकथा नाटकास नगरकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
यावेळी या नाटकातून श्री मानतुंग आचार्यांनी 48 कुलपांच्या आत कोठडीत बंद असताना या स्तोत्राची रचना केली. प्रथम तीर्थंकर ऋषभ देव भगवान ची स्तुती त्याच्यात केली आहे. एक एक स्तुती करता करता त्यांचे कुलूप आपोआप तुटून पडले. या नाटिकेत श्री ऋषभ देव यांची जन्म कथा भक्तामर स्तोत्र ची रचना कशी झाली व त्याचा आत्ताच्या आयुष्यावर कसा प्रभाव पडतो हे सर्व कथा या नाटकातून दाखवित आले.
लेखिका व दिग्दर्शिका मनाली मुनोत या शंभर कलाकारांसोबत भव्य स्टेजवर ही नाटिका सादरीकरण करुन सर्वांनाचे मने जिंकली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौरभ बोरा, आर एस बाफना जळगाव, महेश फिरोदिया,राजेश भंडारी, सोनल चोपडा व संदीप भापकर यांनी विशेष परिश्रम घेतले. न्यू संकल्प स्मार्ट सखीच्या सगळ्या महिलांनी मिळून व अनेक दानदात्यांनी मिळून हा कार्यक्रम प्रयोजित केला होता.