J&K Hajj 2025 | जम्मू आणि काश्मीरमधील पहिला हज यात्री ग्रुप मक्का येथे रवाना
3,372 हुज्जाज कराम ४ मे रोजी सकाळी श्रीनगरहून रवाना झाले आहे
जम्मू-काश्मीरमधील हज यात्रेकरूंची पहिला हज यात्री ग्रुप सोमवार, ४ मे रोजी सौदी अरेबियातील मक्केला रवाना झाला आहे . श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १७८ यात्रेकरू आपल्या पवित्र यात्रेला सुरुवात करणार असून, या भागातून यंदाच्या हज हंगामाला सुरुवात होणार आहे.
१७८ यात्रेकरूंमध्ये ९६ पुरुष आणि ८२ महिलांचा समावेश आहे
दरवर्षी धुल हिज्जाच्या 8 ते 13 तारखेदरम्यान हज यात्रा पार पडते. यावर्षी हज यात्रा कॅलेंडरनुसार 4 जून ते 9 जून 2025 या कालावधीत चंद्र दर्शनानुसार होण्याची शक्यता आहे.
हजची सांगता ईद-उल-अजहाने होते, ज्याला इस्लाममधील दोन मुख्य सणांपैकी दुसरा सण ‘कुर्बानीचा सण’ म्हणून देखील ओळखले जाते.
#WATCH | Srinagar, J&K: First batch of Hajj pilgrims to leave for Mecca, Saudi Arabia pic.twitter.com/eGd6j0c7up
— ANI (@ANI) May 4, 2025