शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात पीक विमा भरण्यास सुरुवात: सरपंच सौ स्वाती बेरड
अहमदनगर (प्रतिनिधी) -प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत महाराष्ट्रात खरीप हंगाम 2024 साठी पीक विमा भरण्याची सुरुवात
दि 18 जूनपासून शासनाच्या http
खरीप 2024 साठी भात, ज्वारी, सोयाबीन, कापूस, तू
विमा योजनेत समाविष्ट पिके भात (धान), खरीप ज्वारी, बाजरी, ना
कारळे, कापूस व कांदा या 14 पिकांसाठी ,अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना भाग घेता येईल. अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित पिके घेणारे (कूळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. पीक कर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक राहील, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पिक विमा पोर्टल वर नोंदणीकृत भाडे करार अपलोड करणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे. आपला 7/12 चा उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड व पिक पेरणीचे स्वयं घोषणापत्र घेवून प्राधिकृत बँकेत किंवा कॉमन सर्विस सेंटर (CSC) च्या मदतीने आपण विमा योजनेत सहभाग घेऊ शकता .पिक विम्यातील अर्ज हा आधार वरील नावाप्रमाणेच असावा, पिक विम्यातील नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या विमा पोर्टल द्वारे आधार संलग्न बँक खात्यामध्ये करण्यात येते. यासाठी आपले बँक खाते आधार संलग्न पेमेंट मिळण्यासाठी अधिकृत असणे आवश्यक आहे. याकरिता आपले बँक मॅनेजर माहिती देऊ शकतात.
तरी शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच सौ स्वाती बेरड यांनी केले आहे