Ladki Bahin Yojna: नवे नियम, नव्या अटी; मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भराल एकदम सोपे
योजनेची घोषणा झाल्यापासूनच याचा लाभ घेण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. पण आता या योजनेचा लाभ घेण्यासाठीचे निकष आणि अटी-शर्थी बदलण्यात आल्या आहेत.
राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेत सादर केला आहे. अजित पवारांनी अर्थसंकल्पात (Budget 2024) महिला, शेतकरी, युवक, वारकरी, अल्पसंख्याक सर्वच वर्गांसाठी घोषणा केल्या. आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सरकारनं ही मतपेरणीच केल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. अशातच अर्थसंकल्पात सरकारनं महिलांसाठी एका खास योजनेची घोषणा केली. ती योजना म्हणजे, ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना’ (Chief Minister Ladki Bahin Yojana). या योजनेतंर्गंत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. ही योजना जाहीर झाल्यापासूनच राज्यभरात याचा लाभ घेण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर अनेक त्रुटी दूर करून नव्या बदलांसह या योजनेचे निकष पुन्हा जाहीर करण्यात आले. आता या योजनेसाठी अर्ज करणं आणखी सोपं झालं आहे.
खालील pdf फॉर्म डाउनलोड
योजनेची घोषणा झाल्यापासूनच याचा लाभ घेण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. पण आता या योजनेचा लाभ घेण्यासाठीचे निकष आणि अटी-शर्थी बदलण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणं आता आणखी सहज आणि सोपं झालं आहे. अद्यापही अनेक महिलांनी यासाठी अर्ज केलेला नाही. अनेक महिलांकडे उत्पन्नाचा दाखला नाही, तर काही जणींकडे जन्म दाखला नसल्यानं अर्ज करता आलेला नाही. पण आता चिंता करण्याची गरज नाही. सरकारकडून अटी-शर्थी बदलण्यात आल्यामुळे या कागदपत्रांऐवजी इतर ओळखपत्र आणि कागदपत्र देऊन तुम्ही झटपट आणि अगदी सहज या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकणार आहात.
अर्ज करण्यासाठी मुदत कधीपर्यंत? (When Is Deadline To Apply Ladki Bahin Yojana?)
‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेसाठी दिलेल्या मुदतीपर्यंत वयवर्ष 21 ते 65 वर्ष वयोगटातील सर्व पात्र महिला अर्ज करू शकतात.
दरम्यान, राज्य शासनानं या योजनेंतर्गत अर्ज करण्याची मुदत 15 जुलैपर्यंतची ठेवली होती. या मर्यादेत शासनाने सुधारणा केली असून आता 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. 31 ऑगस्टपर्यंत अर्ज केलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दरमहा 1 हजार 500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.
योजनेतील अटी-शर्थींमध्ये काही महत्त्वाचे बदल
‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, जन्म दाखला या 4 कागदपत्रांपैकी कोणतंही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र असल्यास ते ग्राह्य धरण्यात येणार आहेत.
2 लाख 50 हजार रुपये उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल, मात्र कुटुंबाकडे पिवळे आणि केशरी रेशनकार्ड असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला देण्याची आवश्यकता असणार नाही.
या योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष ऐवजी 21 ते 65 वर्ष अशी करण्यात आली आहे.
परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल, तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.
या योजनेचा कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेलादेखील लाभ देण्यात येणार आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, मोबाईल ॲपद्वारे या योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रती लाभार्थी 50 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णयही शासनानं घेतला आहे.
कोण असणार पात्र? (Who Will Be Eligible For Mukhyamantri Ladki Bahin Yojana?)
महाराष्ट्र रहिवासी
विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे
60 वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल
अपात्र कोण असेल? (Who Will Be Disqualified For Ladki Bahin Yojana?)
2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे
घरात कोणी Tax भरत असेल तर
कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर
कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर
कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर ( ट्रॅक्टर सोडून )
अर्ज भरताना कोणती कागदपत्रं लागणार?
आधारकार्ड
रेशनकार्ड
उत्पन्नाचा दाखला
रहिवासी दाखला
बँक पासबुक
अर्जदाराचा फोटो
अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र
लग्नाचं प्रमाणपत्र
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही आता मोबाईल द्वारे अर्ज भरू शकता. त्यासाठी कोण कोणती कागदपत्रे हवी. आणि फॉर्म भरण्याची योग्य पद्धत काय? याची ए टू झेड माहिती जाणून घेऊ या
१) सर्वात आधी तुम्हाला गुगलच्या प्ले स्टोअर वरती नारीशक्ती दूत हे ॲप सर्च करायचंय आणि ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. या ॲपद्वारे तुम्ही कित्येक जणांचे अर्ज भरू शकता.
२) आता ॲप इन्स्टॉल झाल्यावर त्याला ओपन करा.
३) आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, ओटीपी आणि टर्म्स अँड कंडिशन यावर क्लिक करून या अॅप्लीकेशनला लॉगिन करून घ्यायचे आहे.
४) त्यानंतर आता तुमच्यासमोर प्रोफाइल अपडेट करा असा ऑप्शन दिसेल.
५) त्यात तुम्हाला तुमचं पूर्ण नाव, ईमेल आयडी, तुमचा जिल्हा, तालुका आणि नारीशक्तीचा प्रकार म्हणजे सर्वसामान्य महिला, बचत गट अध्यक्ष, गृहिणी, ग्रामसेवक या सगळ्या गोष्टी भरायच्या आहेत.
६) आता तुमचे प्रोफाईल अपडेट झाले असेल.
७) आता तुम्हाला नारीशक्ती दूत या पर्यायावर क्लिक करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पर्याय वरती क्लिक करायचे आहे.
८) त्यानंतर सर्वात आधी तुम्हाला या अॅप्लिकेशनला लोकेशनची परमिशन द्यावी लागेल.
९) आता तुमच्यासमोर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म येईल. हा फॉर्म तुम्हाला कोणतीही चूक न करता भरायचा आहे. तुमच्या आधार कार्ड वरती जी माहिती आहे तीच माहिती तुम्हाला येथे टाकायची आहे.
१०) या तुम्हाला आधार कार्डवरील संपूर्ण नाव, जन्मतारीख, पतीचे किंवा वडिलांचे नाव, तुमचे गाव, तालुका, जिल्हा, पिन कोड, आधार कार्ड क्रमांक आणि तुम्ही इतर शासनाच्या योजनेचा लाभ घेत असाल तर त्याची माहिती भरायची आहे.
११) जर तुम्ही शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेत नसाल तर नाही या पर्यायावर क्लिक करा.
१२) आता खाली तुमची वैवाहिक स्थिती काय आहे ते टाकायचे आहे.
१३) त्यासोबतच तुम्हाला महिलेचे लग्न आधीचे संपूर्ण नाव ते येथे नमूद करायचे आहे.
१४) जर महिलेचा जन्म परप्रांतात झाला असेल हो निवडा. आणि जर महाराष्ट्रात झाला असेल तर नाही या पर्यायावर क्लिक करा.
१५) आता खाली अर्जदाराच्या बँकेत तपशील तुम्हाला भरायचा आहे. त्यात अकाउंट नंबर, बँकेचे नाव, आयएफसी क्रमांक, आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे की नाही याची सविस्तर माहिती भरायची आहे.
१६) आता खाली तुम्हाला काही कागदपत्रे अपलोड करण्याचं पर्याय आला असेल.
१७) त्यात आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक, आणि महिलेचा जन्म जर पर प्रांतामध्ये झाला असेल तर त्याचा दाखला ही सर्व कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायची आहेत.
१८) आता सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला खाली अर्जदाराच्या फोटोचा ऑप्शन आला असेल.
१९) तुम्हाला या ठिकाणी कोणताही फोटो अपलोड करायचा नाही. तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या कॅमेऱ्याने अर्जदार महिलेचा लाईव्ह फोटो काढून अपलोड करायचा आहे.
२०) फोटो काढून अपलोड झाल्यावर तुम्हाला खाली “Accept हमीपत्र डिस्क्लेमर” यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला या योजनेसाठी अटी आणि शर्ती काय आहेत याची माहिती आली असेल. आता तुम्हाला ते अॅक्सेप्ट करायचे आहे.
२१) त्यानंतर तुम्ही अपलोड केलेली कागदपत्रे पुन्हा एकदा चेक करून घ्या. त्यानंतर खाली तुम्हाला सबमिट फॉर्म या बटनावर क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला एक ओटीपी येईल तो ओटीपी टाका.
२२) अशा पद्धतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे.
व्हिडीओ सौजन्य साभार माहिती हवी
व्हिडीओ साभार सौजन्य मराठी कॉर्नर