M G Road | ‘मोटू पतलू’ हा देखावा अहमदनगरमधील लहानग्यांचा आकर्षण बनेल : आ. संग्राम जगताप

M G Road | ‘मोटू पतलू’ हा देखावा अहमदनगरमधील लहानग्यांचा आकर्षण बनेल : आ. संग्राम जगताप 

M G Road | 'मोटू पतलू' हा देखावा अहमदनगरमधील लहानग्यांचा आकर्षण बनेल : आ. संग्राम जगताप



अहमदनगर । दर्शक :


कापड बाजार भिंगारवाला चौक येथील आदर्श व्यापारी युवा प्रतिष्ठान वतीने गणेश उत्सवानिमित्त साकारलेल्या मोटू- पतलू देखाव्याचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले. नक्कीच हा देखावा आपल्या अहमदनगरमधील लहानग्यांचा आकर्षणाचा विषय बनेल. 



दरवर्षी गणेश उत्सवानिमित्त सर्व जाती-धर्माचे नागरिक आनंदाने एकत्र येत श्री गणेशाचे आगमन मोठ्या उत्साहात करत असतात. गणेव उत्सव हा एकात्मतेचे प्रतीक बनला आहे. विविध गणेश मंडळं आरस देखाव्याच्या माध्यमातून धार्मिक, ऐतिहासिक, समाज प्रबोधनपर देखावे सादर करत असतात. 



आदर्श व्यापारी मित्र मंडळाकडून दरवर्षी लहान मुलांच्या मनोरंजनासाठी देखाव्याची निर्मिती केली जाते. सर्व कुटंब परिवाराने हा देखावा अवश्य पाहावा.



यावेळी अहमदनगर शहराचे प्रसिद्ध उद्योजक नरेंद्र फिरोदिया, नरेंद्र बाफना, अतुल शिंगवी, शामराव देडगावकर, मा.नगरसेवक प्रकाश भागानगरे, मंडळाचे मार्गदर्शक संजय चोपडा, अध्यक्ष राजेंद्र ताथेड, राजेंद्र गांधी, बापूसाहेब गोरे, प्रवीण शिंगवी,



 अजय गुगळे, लक्ष्मीकांत शेटिया, अमित पितळे, अनिल दुग्गड, रुपेश पारख, बापू गांधी, विजय मालू, डॉक्टर सचिन बोरा, कुणाल भंडारी, किरण पोखरणा, अमित पितळे, सिद्धार्थ बंब, चेतन छल्लाणी, नवरत्न डागा, सीए प्रणेश शेटिया, अविनाश देडगावकर, अनिकेत देडगावकर, विशाल पवार, राहुल सांगळे आदींसह  प्रतिष्ठानचे सर्व सदस्य उपस्थित होते.