Maharashtra: मी फडणवीसांचा माणूस नाही हे सांगण्यासाठी सदावर्ते आंदोलन करत आहेत : सुषमा अंधारे
Maharashtra: मुंबई : गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्त्वातील एसटी कष्टकरी जनसंघ या एसटी कामगार संघटनेने सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी ऐन दिवाळीत संपाची हाक दिली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल होणार आहेत.
तसंच, त्यांनी मराठा आरक्षणा विरोधातही याचिका कोर्टात दाखल करून सध्या बरेच चर्चेत आहेत. यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यानी हल्लाबोल केला त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
“सदावर्तेंना लोक स्वीकारतील का हा खरा प्रश्न आहे. परंतु, सदावर्ते दिवाळीच्या तोंडावर खेळी करत आहेत, ही एक राजकीय खेळी आहे”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
“संबंध महाराष्ट्रात मराठा आरक्षणादरम्यान गुणरत्न सदावर्ते हे फडणवीसांचा माणूस, फडणवीसांचा बोलका बाहुला आहे, असं वातावरण तयार झालं. मी फडणवीसांचा माणूस नाही किंवा फडणवीसांशी तसा अर्था अर्थी संबंध नाही, हे सांगण्याचा भाबडा प्रयत्न म्हणून सदावर्ते फडवीस सरकारमध्ये असताना आंदोलन करत आहेत. परंतु, लोक अशा भ्रामकतेला फसणार नाहीत, हेही तितकंच खरं”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.