Mangala Gour | मंगळागौर महिला शिबीराची उत्साहात सांगता

 मंगळागौर संघ व मानसी डान्स स्टुडिओ आयोजित मंगळागौर महिला शिबीराची उत्साहात सांगता 

Mangala Gour | मंगळागौर महिला शिबीराची उत्साहात सांगता






अहमदनगर : दर्शक । 

मानसी डान्स स्टूडिओच्या संचालिका मानसी देठे यांचे वतीने 1 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर  महिनाभरात  70 महीलांना नृत्याचे प्रशिक्षण देऊन मंगळागौर गाण्याचा शब्दांचा अर्थाचे सहकार्य प्रतिभा देठे यांनी  करुन शिबिराची सांगता चेतना लॉन  येथे संपन्न झाली. 
या प्रसंगी प्रमुख पाहुणे  गुलाबराव खरात साहेब (आयएएस) ,  डॉ. सुधा कांकरिया  (नोबेल शांती पुरस्कार नामांकन प्राप्त), जयंत येलूलकर (अध्यक्ष, रसिक ग्रुप ) , सुरेखा डावरे (संचालिका, अंजली नृत्यालय ) इंजि. निलेश महाजन साहेब , डॉ. दमन काशीद , डॉ.सोनाली बांगर, डॉ. प्रशांत शिंदे, इंजि. किरण साळवे ,डॉ. प्रसाद सायगावकर डॉ. नितीन जगताप  आदी उपस्थित होते.

समारंभात जय देवी मंगळागौरी, सूप सूप सुपल्या ,  फुगड्या, गोफ विनू का गोफ , अशी गाणी नृत्यांसह विविध खेळ महिलांनी सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. तसेच . इंजि.निलेश महाजन ,डॉ. काशीद डॉ. शैलेंद्र खंडागळे यांनी लोकप्रिय जुनी गाणी सादर केली . 
प्रमुख पाहुण्या डॉ. सुधा कांकरिया म्हणाल्या की घर काम नौकरी यातून वेळ काढून घरच्या जबाबदार्या सांभाळत या सर्व महिलांनी शिबीर पूर्ण करून सुंदर नृत्य सादर केले. विसरत चाललेली चालीरिती, परंपरा नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे ,( आयएएस) गुलाबराव खरात, जयंत येलुरकर, सुरेखा डावरे यांनी सांस्कृतिक क्षेत्रातील कलाबद्दल मार्गदर्शन करत आपले विचार व्यक्त केले.

यानंतर उपस्थितांच्या हस्ते शिबिरातील सहभागी महिलांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले. शिबिराच्या सांगता कार्यक्रमासाठी प्रायोजक काशीद हॉस्पिटल, माहेर ब्युटी अँड ट्रेनिंग इन्स्टिट्युट, सुविधा मार्केट, परिहार व्यसनमुक्ती केंद्र, मी राजहंस लर्निग डेव्हलपमेंट अँड थेरपी सेंटर, शांतिनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी, 
 बालाजी इलेक्ट्रिकल, अविनाश क्लासेस, 32 स्माईल दातांचा दवाखाना यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदिका डॉ. प्राजक्ता सावेडकर आणि संगीत सितारे ऑर्केस्ट्राचे विनोद कसबेकर यांनी केले.