Manik Chowk | पंचमुखी हनुमान अवतार देखाव्याचे उदघाटन संपन्न

Manik Chowk | नगर : दर्शक ।
येथील माणिक चौकातील महावीर प्रतिष्ठानच्या पंचमुखी हनुमान अवतार,अहिररावण चा वध या देखाव्याचे उदघाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले.यावेळी उद्योजक नरेंद्र फिरोदिया,डॅा.प्रकाश कांकरिया,सौ सुधा कांकरीया,आनंदराम मुनोत
,माणिकराव विधाते,सिध्दार्थ गांधी,संभाजी कदम,कमलेश भंडारी,किरण शिंगी,अतुल शिंगवी,संतोष गांधी,हर्षल गुगळे,मंडळाचे अध्यक्ष हर्षल बोरा आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आ.जगताप म्हणाले आपल्या सामाजिक कार्यासाठी मंडळ राज्यात प्रसिद्ध आहे,दरवर्षी ते प्रबोधनात्मक देखावे सादर करतात,मंडळ फिरते अन्नछत्र चालवत असून त्याचा असंख्य गरजू फायदा घेतात तसेच अहिल्यानगर करंडक हि राज्यस्तरीय स्पर्धा हि त्याची राज्यभर ओळख करून देते.
मंडळाचे अध्यक्ष हर्षल बोरा असून राकेश भंडारी,आशिष चोपडा,श्रीपाल शिंगी,अमित फिरोदिया,पुष्कर तांबोळी,स्वप्नील मुनोत,रितेश पारख,निखील गांधी,प्रसाद बोरा,प्रसन्न भंडारी,दश्रन चाणोदिया,आनंद गांधी,रोहित गांधी,सुजीत कटारीया,आशिष गुंदेचा,चेतन गुंदेचा,सोमनाथ मुळे आदी कार्यकर्ते देखाव्यासाठी प्रयत्न करत आहे.
