Manu Bhaker: शाबास ! मनू भाकर दोन पदकांसह मायदेशी परतणार ; पदकांची हॅटट्रिक थोडक्यात हुकली पहा व्हिडीओ
पदकांची हॅटट्रिक संधी पासून भारताची २२ वर्षीय नेमबाज मनू भाकर थोडक्यात हुकली . पॅरिस ऑलिम्पिकच्या (Paris Olympics 2024) २५ मीटर पिस्तूलमध्ये ती चौथ्या स्थानावर राहिली. शेवटच्या क्षणी ती टॉप-३ मधून बाहेर पडली, तर त्याआधी ती सुवर्णपदकाची दावेदार होती. मनूने सुरूवातीला ५ पैकी २ शॉट लगावत फारशी चांगली सुरूवात झाली नाही. ती सहाव्या स्थानावर होती, पण नंतर ५ पैकी ४ गुण तिने गाठले. मग ती चौथ्या स्थानावर पोहोचली आहे आणि इथून तिने जबरदस्त कमबॅक केलं. पण अखेरच्या सीरिजमध्ये ती एका शॉटपासून चुकली.
२२ वर्षीय मनू भाकर (Manu Bhaker) महिलांच्या फायनलमध्ये २८ गुण मिळवले आणि एकाच ऑलिम्पिकमध्ये पदकांची हॅट्ट्रिक पूर्ण करण्यास ती चुकली. तिला शूटऑफमध्ये कांस्यपदक विजेत्या हंगेरीच्या वेरोनिका मेजरकडून पराभव पत्करावा लागला. यापूर्वी मनूने १० मी एअर पिस्तुल एकेरी आणि मिक्स्डमध्ये सरबज्योत सिंगसह दोन कांस्यपदकं जिंकली. भाकेरपूर्वी, कोणत्याही भारतीय खेळाडूने (स्वतंत्र भारत) एकाच ऑलिम्पिकमध्ये एकापेक्षा जास्त पदके जिंकलेली नाहीत.
मनू भाकरने अंतिम सामन्यात चमकदार कामगिरी केली, पण त्याची एक चूक त्याला महागात पडली. शूट-ऑफ टायब्रेकरनंतर चौथ्या स्थानावर राहिल्यानंतर मनू भाकेरला एलिमिनेशनचा सामना करावा लागला. मनू भाकेरला या फेरीत ५ शॉट्स घ्यावे लागले. मनू भाकरला या ५ पैकी केवळ ३ शॉट मारता आले आणि तिचा स्कोअर १०.२ होता. तर, चौथ्या स्थानावर असलेल्या वेरोनिकाने लक्ष्यावर ४ शॉट्स मारले.
यामुळे मनू भाकरचे स्वप्न भंगले आणि तिला अवघ्या १ शॉट चुकल्याने तिसरे पदक जिंकता आले नाही. तरीही २२ वर्षीय तरुणीने अद्वितीय कामगिरी केली आणि आता ती पॅरिस ऑलिम्पिकमधून दोन पदकांसह मायदेशी परतणार आहे.शाबास ! मनु देशाची मान उंचावल्याबद्दल.