Meherbaba | नगरला २५ फेबु ला मेहेरबाबाचा जन्मोस्तव कार्यक्रम
Meherbaba | नगर : दर्शक ।
मधील सरोष पेट्रोल पंपा शेजारील अवतार मेहेरबाबा नगर केंद्रामध्ये अवतार मेहेरबाबाच्या १३२ वा जन्मोस्तव कार्यक्रम दि २५ फेबु ला होणार आहे अशी माहिती डॉ मेहेरनाथ कलचुरी यांनी दिली.
दि २५ रोजी पहाटे ६ वा अवतार मेहेरबाबा याचा जन्मोस्तव सोहळा होणार आहे,याप्रसंगी विविध कार्यक्रम होणार आहे . नगरसह देश विदेशातील भाविक यावेळी गीते सादर करतील.तर बाबा कार्या विषयी प्रवचन हि होणार आहे ,नंतर सकाळी ९ वाजता मेहेरबाबाच्या सप्तरंगी ध्वजाचे अनावरण होणार आहे, यावेळी ध्वजगीत,भजन,आरती होईल.
२६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी मेहेर प्रेमीनीचा मेळावा होणार आहे तरी सर्व नगरकरांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन नगर सेंटरच्या पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.
मेहेरबाबा भक्तांच्या माहितीसाठी
नगर शहरातील मध्यवस्तीत सरोष पेट्रोल पंपा जवळ, प्रसिद्ध उद्योगपती नरेंद्र फिरोदिया यांच्या आय लव्ह नगर आफिस फोर्स शोरूमच्या पाठीमागे, बंद पडलेल्या दीपाली टॉकीज शेजारी अहिल्या नगर महानगरपालिका उद्यान विभागाला आणि मनपा प्रशासनाला ज्याच विसर पडला आहे अशी नगर मनपाची अधिकृत सरोष बागे जवळ झेंडीगेट येथे अवतार मेहेरबाबा यांनी आपल्या जीवनातील अनेक आठवणी या ठिकाणी अजूनही आहेत आणि शहरातील मध्यवस्तीत या केंद्रावर मेहेरबाबा यांनी अमेरिका,फ्रांस,जर्मनी, रशिया इराण,इराक,ऑस्ट्रेलिया, लंडन,आफ्रिका, युक्रेन तसेच जगभरातील त्यांचे भक्त शहरातील या केंद्रावर बाबांच्या भेटीला येतात आणि मुकामाने राहतात अरणगावचे मेहेरबाद आणि पिपंळगावचे मेहेरज़ाद बरोबर नगर शहरातील मेहेरबाबा यांचे हे निवासस्थान अत्यन्त महत्वाचे होते आणि बाबांना या केंद्रावर विशेष प्रेम होते याचे अनेक पुरावे आपल्याला मिळतील. मेहेरबाबा यांच्या शहरातील या केंद्रावर हा कार्यक्रम होत आहे
.webp)