Meherbaba Nagar | रमाबाई कलचुरी यांच्या वाढदिवसा निम्मित विविध कार्यक्रम संपन्न

Meherbaba Nagar | नगर : दर्शक । अवतार मेहेरबाबा ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष व बाबांचे रहिवासी मंडळीमधील शेवटच्या उर्वरित सदस्य,आणि बाबावर वीस-खंड चरित्र प्रभु मेहेर लिहिलेले,मेहेरबाबा असंख्य साहित्यिक कामे,लेखक केलेले कै भाऊ कलचुरी यांच्या धर्म पत्नी रमाबाई कलचुरी यांचा ९४ वा वाढदिवसा निम्मित विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
रमाबाई कलचुरी या लग्नाअगोदर पासून बाबाच्या भक्त होत्या,लग्नानंतर अनेक वर्षे त्यांना भाऊसाहेबांच्या बरोबर मेहेरबाबा ची सेवा करण्याची संधी मिळाली मेहेरबाबाना पाहिलेले,बरोबर राहिलेले व मंडळीतील मोजकेच लोक सध्या आहेत त्यात रमाबाई आहेत .
वाढिवसा निम्मित आयोजित कार्यक्रमात त्यांनी मेहेरबाबाच्या, भाऊसाहेब कलचुरींच्या अनेक आठवणी सांगितल्या यावेळी संगीत, गाणे भजनांचा कार्यक्रम झाला.मेहेरबाबाची आरती व प्रार्थना करण्यात आली तर केक कटिंग केल्यावर अनेकांनी रमाबाईनी शतायुषी व्हा म्हणून शुभेछया दिल्या.
