विविध कार्यक्रमांनी मेहेरबाबा अहमदनगर सेंटरचा वर्धापन दिन संपन्न
अहमदनगर (प्रतिनिधी) : अहमदनगर मनपाच्या सरोश बागे शेजारी आणि बंद पडलेली दीपाली टॉकीजच्या पाठीमागे असलेल्या मधील सरोष पेट्रोल पंपाशेजारील अवतार मेहेरबाबा नगर केंद्राचा ६५ वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमाने उत्साहात संपन्न झाला.
यावेळी सेंटरचे अध्यक्ष मेहेरनाथ कलचुरी,प्रा सुनील मांढरे,दीपक थाडे,नितीन थाडे,मधुकर डाडर व परिवार,नीलिमा औटी,मेहेर भुज्जी,संतोष पाटसकर,श्रुती मुळे,माधुरी साखला,श्री जोशी आदींसह मोठ्या संख्नेने भाविक व नगरकर उपस्थित होते.
यावेळी मेहेरप्रेमींनी बाबावरील भजन,आर
डॉ मेहेरनाथ कलचुरी यांनी यावेळी सेंटरची स्थापना व बाबाच्या कार्याविषयी माहिती दिली.ते म्हणाले बाबाचे जगात सेंटर होते.पण नगरमध्ये नव्हते.तेव्हा मेहेरबाबानी सेंटर स्थापन करण्याची सूचना केली.मग मेहेरप्रेमींच्या घरी दर शनिवारी सेंटर सुरु करावयाचे ठरले.पण त्याकाळी वाहनांची व संवादाची सुविधा जास्त नव्हती.
त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जाणे शक्य नव्हते. मग आदी इराणी याना जागा मागण्यात आली.त्यांनी सरोष पेट्रोल पंपाशेजारील या जागेतील एक खोली दिली २९ जूनला सेंटर भरून पहिला प्रोग्राम झाला व सेंटर सुरु झाले नंतर आरती प्रार्थाना करण्यात आली व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
आंतरराष्ट्रीय अवतार मेहेरबाबा यांच्या भाविक भक्तांच्या माहितीसाठी
बंद पडलेली दीपाली टॉकीजच्या झेंडीगेटच्या पाठीमागे आणि अहमदनगर मनपाची अधिकृत सरोश बागे जवळ सरोश पेट्रोल पंप शेजारी जागतिक संत अवतार मेहेरबाबा यांचा अहमदनगर सेंटर असून मेहेरबाबा यांना मानणारे भाविक भक्त अमेरिका,लंडन,पॅरिस,ऑस्ट्रेलिया,इटली फ्रांस, आयरलँड ,फिनलँड, लैक्सबर्ग,पोलंड, बार्बाडोस,कॅनडा, डेन्मार्क,रशिया,जर्मनी,ईराण,इराक तसेच जगभरातील विविध देशातून अहमदनगरच्या शहरातील मध्यवस्तीत असलेल्या या सेंटरवर त्याकाळीही येत होते आणि आजही येत असतात. अहमदनगर शहरातील या सेंटरवर मेहेरबाबा यांनी आपल्या जागतिक भक्तांना प्रेम आणि शांतीचे संदेश दिले आणि या सेंटरमधून अनेक प्रवचनेही दिली मेहेर बाबा यांच्या जीवनातील विविध आठवणी या अहमदनगर शहरातील सेंटर मध्ये उपलब्ध आहेत