Wednesday, November 19, 2025
HomeAhmednagarMIDC | नागापूर एमआयडीसी मध्ये बीपीसीएल तर्फे पीएनजी वापरावरील मार्गदर्शन बैठक उत्साहात

MIDC | नागापूर एमआयडीसी मध्ये बीपीसीएल तर्फे पीएनजी वापरावरील मार्गदर्शन बैठक उत्साहात


 MIDC | नागापूर एमआयडीसी मध्ये बीपीसीएल तर्फे पीएनजी वापरावरील मार्गदर्शन बैठक उत्साहात

MIDC | नागापूर एमआयडीसी मध्ये बीपीसीएल तर्फे पीएनजी वापरावरील मार्गदर्शन बैठक उत्साहात


नगर : दर्शक । १९ नोव्हेंबर २०२५ । 

        नागापूर एमआयडीसी नगर औद्योगिक परिसरात भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) तर्फे पाइपलाइन नैसर्गिक वायू (पीएनजी) संदर्भातील महत्त्वपूर्ण मार्गदर्शन बैठक उत्साहात पार पडली. औद्योगिक क्षेत्रात पीएनजी चा वाढता वापर, त्याचे तांत्रिक फायदे, सुरक्षितता आणि आर्थिक लाभ याबाबत सविस्तर माहिती या बैठकीत देण्यात आली.

     बैठकीत बीपीसीएलचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री मनोज कुमार जाधव, श्री दीपक गुसाई (उपमहाव्यवस्थापक – द्रवीभूत नैसर्गिक वायू विपणन) आणि श्री अनुपम श्रीवास्तव (वरिष्ठ विपणन व्यवस्थापक – वायू विभाग) यांनी मार्गदर्शन केले. अहमदनगर ऑटो क्लस्टर समूहाचे अध्यक्ष श्री दौलत शिंदे, संचालक श्री अविनाश बोपर्डीकर,  संचालक नागराज बदगीरी, श्री के. एम. भिंगारे, तसेच आमी संस्थेचे अध्यक्ष श्री जयद्रथ खकाळ यांच्यासह एमआयडीसी परिसरातील विविध उद्योगांचे संचालक, अभियंते आणि तांत्रिक अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     बीपीसीएलच्या अधिकाऱ्यांनी पाइपलाइन नैसर्गिक वायू हा पारंपरिक इंधनांपेक्षा अधिक सुरक्षित, स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि किफायतशीर पर्याय असल्याचे स्पष्ट केले. सतत उपलब्धता, उच्च उष्मांक, कमी चालू खर्च तसेच उपकरणांच्या आयुष्यात होणारी वाढ यामुळे औद्योगिक उत्पादनक्षमता मोठ्या प्रमाणात वाढते, असे. बीपीसीएलचे प्रादेशिक व्यवस्थापक मनोज कुमार जाधव  म्हणाले.

       बैठकीत पीएनजी संदर्भातील सुरक्षा मानकांवर विशेष भर देण्यात आला. गळती प्रतिबंधक तंत्रज्ञान, अत्याधुनिक नियंत्रण प्रणाली, पाइपलाइन बांधणीची प्रक्रिया तसेच एमआयडीसी परिसरातील आगामी विस्तार योजनांबाबत तपशीलवार सादरीकरण करण्यात आले. उद्योग प्रतिनिधींनी विविध तांत्रिक शंकांचे निरसन करत पीएनजी जोडणी व वापराबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन घेतले.

       बीपीसीएल तर्फे नागापूर एमआयडीसी परिसरात 24 तास उपलब्ध असलेली पीएनजी सेवा आता वेगाने विस्तारत असून शेकडो औद्योगिक युनिट्सना याचा लाभ मिळत आहे. यामुळे औद्योगिक विकासाला नवी गती मिळणार असल्याचे अधिकारी आणि क्लस्टर प्रतिनिधींनी मत व्यक्त केले.

       बीपीसीएल आणि अहमदनगर ऑटो क्लस्टर समूह यांच्या संयुक्त विद्यमाने ही बैठक यशस्वीरीत्या संपन्न झाली.



RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments