Wednesday, November 19, 2025
HomeAhmednagarMolana Azad Awards | नाजेमा नवाब यांचा भारतरत्न मौलाना अबुल कलाम आजाद...

Molana Azad Awards | नाजेमा नवाब यांचा भारतरत्न मौलाना अबुल कलाम आजाद शिक्षक पुरस्काराने सन्मान


  Molana Azad Awards | नाजेमा नवाब यांचा भारतरत्न मौलाना अबुल कलाम आजाद शिक्षक पुरस्काराने सन्मान

नाजेमा नवाब यांचा भारतरत्न मौलाना अबुल कलाम आजाद शिक्षक पुरस्काराने सन्मान



नगर : दर्शक । १९ नोव्हेंबर २०२५ । 

 जिल्हा परिषद उर्दु शाळा सोनई नंबर 4 ता.नेवासा च्या शिक्षिका शेख नाजेमा नवाब ह्यांनी शाळेची सुरुवात एका मुलापासून केली. त्या शाळेत एकट्या होत्या. सोनई परिसरात एकूण 12 शाळेचा समावेश असून 5 जिल्हा परिषद शाळा आहे आणि खाजगी 7 शाळा असून इतक्या स्पर्धे मध्ये त्यांनी शाळेत मुले दाखल केली.

या वर्षी पाचवीचा वर्ग सुरू केला.  त्यांनी विद्यार्थ्यांची संख्या ही शाळेत वाढवली व त्या विद्यार्थ्यांसाठी  अनेक शैक्षणिक उपक्रम राबवत असतात. सोनई येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रगतीसाठी त्यांचा मोलाचा वाटा आहे.त्यांच्या या सर्व शैक्षणिक व सामाजिक बाबींचा आढावा घेऊन मखदुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी व अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदे तर्फे देण्यात येणारा भारतरत्न मौलाना अबुल कलाम आजाद शैक्षणिक पुरस्कार 2025 त्यांना प्रदान करण्यात आला.

भारताचे पहिले शिक्षणमंत्री व थोर स्वातंत्र्यसेनानी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्ताने शहरात राष्ट्रीय कौमी एकता सप्ताह निमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात  शेख नाजेमा नवाब यांना सर्जेपूरा येथील रहेमत सुलतान सभागृहात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी अँग्लो उर्दू हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज संगमनेरचे मुख्य विश्‍वस्त अब्दुलाह हसन चौधरी,

चेअरमन हाजी शेख गनी, शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी मखदुम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आबिद दुल्हेखान, डॉ.कमर सुरुर, अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे सलीम खान पठाण, मौलाना आझाद महोत्सव समितीचे अध्यक्ष भैरवनाथ वाकळे, सचिव युनूसभाई तांबटकर आदी उपस्थित होते.

त्यांच्या कामामुळे त्यांना यापुर्वीही असबाक अवॉर्ड, नारीशक्ती अवॉर्ड मिळाले आहे.पुरस्काराला उत्तर देताना शेख नाजेमा म्हणाल्या कि कामाचे कौतुक झाल्यावर अजून जोमाने काम करायला बळ मिळते.काम करतानाही असेच समाजामधून सहकार्य मिळाल्यास भविष्यात पण विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबविण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली.

कार्यक्रमात शिक्षकांवर सध्या वाढलेल्या अनेक कामाचे ताणतणावात पण विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांचा मान्यवरांनी आपल्या भाषणातून गौरव केला.



RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments