
Nagar abacus | राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेमध्ये श्री आनंद पार्श्व गुरुकुल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
Nagar abacus | नगर : दर्शक ।
नुकतीच नगर येथे एक्स्पर्ट अबॅकस अकॅडमी आयोजित 15 वी राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धा आणि बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला. या स्पर्धेत विविध जिल्यातील 500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विकास कोटकर आणि सौ. मनीषा कोटकर यांनी मार्गदर्शन केले.
या स्पर्धेत श्री आनंद पार्श्व गुरुकुल स्कूलच्या 20 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सहभागी सर्वच विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर टॉप 8 चे क्रमांक मिळवून यश संपादन केले.
पार्थ गणेश टाटिया ( प्रथम क्रमांक ), आरूष सुनील घेंबुड ( पाचवा क्रमांक ), शिवंन्या प्रदीप परदेशी ( पाचवा क्रमांक ) जैना अमोल पारख ( पाचवा क्रमांक ), विधी मयूर बोरा ( पाचवा क्रमांक ), राजनंदिनी मनोज कोठुळे ( पाचवा क्रमांक ), सई विनोद मुळीक ( पाचवा क्रमांक ), शिवांश किशोर म्हसे ( पाचवा क्रमांक ), प्रणवी संदीप गिऱ्हे ( सहावा क्रमांक ), आस्था रितेश पारख ( आठवा क्रमांक ), गौरी राजेंद्र दळवी ( आठवा क्रमांक ),
श्रीजा प्रदीप परदेशी ( आठवा क्रमांक ), वेदिका जगदीश आंबेकर ( आठवा क्रमांक ), वेकरिया जिनेश मयूर ( आठवा क्रमांक ), प्रिन्स अमित कुमार ( आठवा क्रमांक ), स्वरा संदीप तळेकर ( आठवा क्रमांक ), हितिषा अमोलजी पारख ( आठवा क्रमांक ), गायत्री संदीप गिऱ्हे ( आठवा क्रमांक ), परिधी संचेती ( आठवा क्रमांक ) सोलंकी रियांशिबा जयसिंग ( आठवा क्रमांक )
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना श्री आनंद पार्श्व गुरुकुल शाळेचे कुंदनऋषिजी आणि आलोकऋषिजी मारसाब, सौ मेघा मयूर बोरा मॅडम आणि मुख्याध्यापिका सौ.कादंबरी राजेश सुर्यवंशी मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
