Nagar Court | दोन खुनाच्या आरोपातून दोघे निर्दोष
Nagar Court |
नगर- राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर येथे दि. १९/०७/२००६ रोजी म्हसे कॉलनीमध्ये हिराबाई विश्वनाथ यांच्या बंगल्यामध्ये पहाटे ३ ते ३.३० वा.चे दरम्यान आरोपी १. राजेंद्र तात्याबा शिंदे, २. मुरली साहेबा शिंदे, रा. इटकुर, ता. कळंब, जि. उस्मानाबाद यांनी
त्यांच्या सहका-यासहीत संगनमताने फिर्यादीचे बंगल्याचे दरवाज्याचे कडी, कोंडा तोडून हातात गज घेऊन फिर्यादीचा मुलगा व पती यांना मारहाण करुन दोघांना जिवे ठार मारले व फिर्यादीस व साक्षीदार नातू यांना जबर मारहाण करुन त्यांचे अंगावरचे सोन्याचे दागिणे जबरीने चोरुन नेले
म्हणून फिर्यादी हिराबाई विश्वनाथ पेरणे यांचे फिर्यादीवरुन राहुरी पोलिसांनी आरोपी विरुध्द भा.दं.वि. कलम ३९५, ३९६, ३४२ अन्वये गुन्हा दाखल केला असता, वरील दोन आरोपी यांचे विरुध्दच्या खटल्याचे चौकशीचे कामकाज नुकतेच जिल्हा न्यायालयात होऊन त्यात
वरील दोनही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. आरोपीतर्फे अॅड. सतिशचंद्र सुद्रीक व अॅड.एम.एच. पठाण यांनी काम पाहिले.

