Wednesday, November 19, 2025
HomeAhmednagarNagar Music | संगीत स्वयंवर नाटकाच्या यशस्वी सादरीकरणाबद्दल कलाकारांचा विशेष सन्मान

Nagar Music | संगीत स्वयंवर नाटकाच्या यशस्वी सादरीकरणाबद्दल कलाकारांचा विशेष सन्मान


 Nagar Music | संगीत स्वयंवर नाटकाच्या यशस्वी सादरीकरणाबद्दल कलाकारांचा विशेष सन्मान 

Nagar Music | संगीत स्वयंवर नाटकाच्या यशस्वी सादरीकरणाबद्दल कलाकारांचा विशेष सन्मान


 Nagar Music | नगर : दर्शक । 

 येथिल सर्वकल्याणम् प्रतिष्ठानच्या वतीने   *संगीत स्वयंवर* संगीत नाटकाच्या यशस्वी सादरीकरणा बद्दल विशेष सन्मान सोहळा श्रीकृष्ण हाॅलमध्ये आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष व मुख्य अतिथी पवन श्रीकांत नाईक यांचे हस्ते व संस्था अध्यक्ष डॉ अशोक काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

         श्रृती संगीत निकेतनच्या डॉ धनश्री व मकरंद खरवंडीकर तसेच ओवी सानप, रिद्धी कुलकर्णी, मंजुशा कुलकर्णी, ऋषिकेश कुलकर्णी, शौनक कुलकर्णी, वेदांत कुलकर्णी, समर्थ कोर्टीकर, अनिकेत देऊळगांवकर, सर्वेश खोल्लम, शेखर दरवडे व दीप्ती खरवंडीकर या गायक व वादक कलाकारांना सन्मानीत करण्यात आले.

         कार्यक्रमात सर्व मान्यवर, रसिक व स्थानीक लोकांच्या विशेष उपस्थितीत *वंदे मातरम्* या स्वातंत्र्याच्या गिताला १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विशेष ध्वजासह सामुहीक गायन करण्यात आले.

         कार्यक्रम प्रसंगी सर्वकल्याणम् चे अॅड सुप्रीया देपोळकर, बाळासाहेब तरवडे, एन.डी.जाधव, व्यंकटेश कटकम, गोरखनाथ रोहोकले, अनुपमा काळे तसेच ज्येष्ठनागरीक मंचाचे बलभीम पांडव, योगशिक्षीका मंगला गौरीधर, नृत्य साधक सिद्धी सोलट आदी मन्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत व परीचय निर्मल नगरकर यांनी केले. श्रीकांत नाईक यांनी कार्यक्रम प्रास्ताविक केले तर आभार शिरीष कुलकर्णी यांनी मानले.



RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments