Nagar Music | स्वरांकित म्युझिक अकॅडमीतर्फे नगरमध्ये मोफत संगीत कार्यशाळेचे आयोजन

Nagar Music | नगर : दर्शक । – स्वरांकित म्युझिक अकॅडमीमार्फत येत्या 25 ऑगस्ट 2025 पासून 5 दिवसीय मोफत संगीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मुलांची संगीताची गोडी वाढावी, त्यांच्यावर संगीताचे चांगले संस्कार व्हावेत या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या धकाधकीच्या जीवनात संगीत किती महत्वाचे आहे याची सर्वांना कल्पना आहेच. संगीत ही गुरुमुखी विद्या आहे ही समोर बसूनच आत्मसाद करावी लागते त्यामुळे ऑनलाईन न शिकता समोर प्रत्यक्ष मुलांनी शिकावे हा यामागे हेतू आहे. विशेष बाब म्हणजे कार्यशाळेसाठी वयाची कोणतीच अट घालण्यात आली नाही. वय वर्ष 3 पासून पुढे 75 वयापर्यंत प्रवेश दिले जाणार आहेत. त्यामुळे पालक सुद्धा कार्यशाळेत सहभागी होऊ शकतात.
तबला ढोलक ढोलकी पखावज कीबोर्ड गिटार गायन हार्मोनियम अशा विविध प्रकारच्या कला आपण या कार्यशाळेत शिकू शकता. या कार्यशाळेची वेळ संध्याकाळी 7 ते 8 ही ठेवण्यात आली आहे.
कार्यशाळेचा पत्ता – स्वरांकित म्युझिक अकॅडमी, श्री सांदीपनी अकॅडमी समोर, एचडीएफसीबँक जवळ, पाईपलाईन रोड अहिल्यानगर. नगरकरांनी या कार्यशाळेचा जरूर फायदा करून घ्यावा असे आवाहन स्वरांकितचे सर्वेसर्वा ऋषिकेश कुलट यांनी केले आहे.
नाव नोंदणीसाठी 9922809090/9922510202 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
