
Nagar Sports | नगर जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा उत्साहात संपन्न
Nagar Sports | नगर : दर्शक । – क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नगर जिल्हा अमॅच्युअर तायक्वांदो असोसिएशन संयुक्त विद्यमाने तसेच अरुणोदय क्रीडा प्रतिष्ठान, नगर यांच्या सहकार्याने जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धा २०२५-२६ चे भव्य आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील विविध शाळांमधील ३८२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
या स्पर्धेचे उद्घाटन आ. संग्रामभैय्या जगताप,उपमहापौर गणेशजी भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आ.जगताप म्हणाले क्रीडेमुळे शरीरच नव्हे तर मनही सुदृढ राहते. तायक्वांदो सारख्या खेळामुळे आत्मसंरक्षणाची जाणीव होते आणि राष्ट्रासाठी पराक्रम गाजवण्याची ताकद मिळते. विद्यार्थ्यांनी केवळ जिल्हा वा राज्यस्तरापुरते मर्यादित न राहता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पदकं मिळवून महाराष्ट्राचं आणि देशाचं नाव उज्ज्वल करावे.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर गणेशजी भोसले, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे, माजी नगरसेवक बाळासाहेब बारस्कर, तायक्वांदो शहर जिल्हाअध्यक्ष माणिकराव विधातेसर,क्रीडा अधिकारी संतोष वाबळे तायक्वांदो जिल्हाअध्यक्ष संजयजी आनंदकर सर,अमित बडदे सुरज खंडिझोड,वैभव देशमुख, तायक्वांदो जिल्हा सचिव महेश आनंदकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पंच म्हणून सुबोत जगताप, विक्रांत रणशिंग, ऋषीकेश घोडेकर, चेतन जावळे, सिद्धेश आनंदकर, सरिण शेख, जयेश आनंदकर, साक्षी कांबळे, शिवानी वाळके, पलक जैन, भूमी धामणे , कार्तिक मोढवे, परवेज तांबोळी यांनी काम पाहिले
स्पर्धेचे आयोजन वाडिया पार्क येथील जिल्हा क्रीडा संकुलामध्ये करण्यात आले.
