Wednesday, November 19, 2025
HomeAhmednagarNagar Swimming | महापालिका आयोजित शालेय जलतरण स्पर्धेत कराळे हेल्थ क्लबचा डंका

Nagar Swimming | महापालिका आयोजित शालेय जलतरण स्पर्धेत कराळे हेल्थ क्लबचा डंका

Nagar Swimming | भार्गवी घोडके, तनवी आवटे, अनुष्का बांगर, श्रावणी देशमुख, श्रीयांश  देशमुख, वीरेन सुरम, स्वराली तांदळे, अमृतसिंग राजपूत, ऋतुराज डापसे, अथर्व कराड, वेदांत कराड, विश्वराज डापसे ठरले अव्वल

 

 

Nagar Swimming | नगर : दर्शक ।
नगर महानगरपालिकेने आयोजित केलेली यावर्षीची शालेय जलतरण स्पर्धा कराळे हेल्थ क्लबच्या जलतरणपटूंनी डंके की चोट पर आपल्या खिशात घातली.या स्पर्धेत विविध वयोगटात आणि प्रकारांमध्ये कराळे हेल्थ क्लब मध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंनी आपले कसं दाखवत अव्वल स्थान पटकावले.

17 वर्षाखालील वयोगटात भार्गवी घोडके ने 100 आणि 200 मीटर मीटर फ्रीस्टाइल मध्ये प्रथम तर 50 मीटर फ्रीस्टाइल मध्ये तिसरा क्रमांक पटकावला.याच वयोगटात 50 मीटर ब्रेस्ट आणि बॅक स्ट्रोक मध्ये तसेच फ्रीस्टाइल मध्ये तन्वी आवटेने पहिला क्रमांक मिळवला.

याच वयोगटात अनुष्का बांगर ही 100 मीटर फ्री आणि बॅक स्ट्रोक मध्ये दुसरी आली.याच वयोगटाच्या पुरुषांमध्ये पन्नास मीटर आणि शंभर मीटर फ्लाय स्टाईल, तसेच 200 मीटर आय एम प्रकारात पहिला क्रमांक मिळवला.

ऋतुराज डापसेने या गटात 100 मीटर फ्रीस्टाइल, पन्नास मीटर फ्री स्टाइल आणि 100 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये पहिले स्थान मिळवले.  अथर्व कराडने 50 मीटर आणि शंभर मीटर ब्रेस्ट स्टाइल मध्ये दुसरे तर 200 मीटर ब्रेस्ट स्टाईल मध्ये तिसरे स्थान मिळवले.

शिवानी देशमुख ने पन्नास मीटर फ्री स्टाईल आणि बॅच स्ट्रोक मध्ये पहिला क्रमांक तर ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये दुसरे स्थान मिळवले. ती वय वर्ष 14 खालील गटात खेळत होती.

 

याच गटात विरेन सुरमने 50 मीटर फ्री आणि ब्रेस्ट स्ट्रोक 100 मीटर फ्रीस्टाइल मध्ये तिसरा क्रमांक मिळवला. स्वराली तांदळेने याच वयोगटात 200 आणि 400 मीटर फ्रीस्टाइल मध्ये पहिला आणि 200 मीटर बॅकस्ट्रोक मध्ये दुसरा क्रमांक मिळवला.

 

याच वयोगटात मुलांनी चांगली बाजी मारली. वेदांत कराडने 50 मीटर फ्री स्ट्रोक आणि ब्रेस्ट स्ट्रोक आणि 100 मीटर फ्रीस्टाइल मध्ये दुसरे स्थान मिळवले. विश्वराज डापसेने 50 मीटर ब्रेस्ट आणि 100 मीटर ब्रेस्ट आणि बॅक स्ट्रोक मध्ये पहिले स्थान मिळवले.
या खेळाडूंचे कराळे हेल्थ क्लब चे संचालक शिवाजी कराळे यांनी अभिनंदन केले आहे.

 

कराळे हेल्थ क्लबचे संचालक करण कराळे, प्रशिक्षक राष्ट्रीय खेळाडू सर्वेश देशमुख यांचे मार्गदर्शन यशस्वी

या हेल्थ क्लबचे संचालक युवा खेळाडू करण कराळे हे या जलतरणपटूंच्या कामगिरीकडे सातत्याने लक्ष ठेवून असतात. जलतरण तलाव मधील सेवांची आणि पाण्याची विशेष देखरेख ठेवतात. प्रत्येक स्पर्धेत आपल्या खेळाडूंनी यशस्वी व्हावे या पद्धतीने खेळाडूंचा सराव व्हावा यासाठी ते प्रयत्न करत असतात. जलतरणपटूंची प्रगती आणि खेळ याविषयी ते प्रशिक्षक सर्वेश देशमुख यांच्याशी चर्चा करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करतात त्यामुळेच कराळे हेल्थ क्लबचे खेळाडू नेहमी यशाचा अव्वल टप्पा गाठतात आणि हेल्थ क्लब ची ख्याती वाढवतात या निकालाबद्दल सर्वांनी कराळे हेल्थ क्लबच्या खेळाडूंचे विशेष अभिनंदन केले आहे

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments