
Nagar Tehsil | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन “सेवा पंधरवडा’ म्हणून साजरा करणार : तहसीलदार संजय शिंदे
नगर : दर्शक –
Nagar Tehsil | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सेवा पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येत असून १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत तीन टप्प्यामध्ये विविध शासकीय उपक्रमांमार्फत साजरा केला जाणार असल्याची माहिती नगरचे तहसीलदार संजय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातंर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन दिनांक 17 सप्टेंबर, 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक 02 ऑक्टोबर, 2025 या कालावधीमध्ये “सेवा पंधरवडा’ साजरा करावयाचा आहे. त्यानुसार खालीलप्रमाणे अभियान राबवयचे आहे.
अ) पहिला टप्पा पाणंद रस्ते विषयक मोहिम दि. 17/09/2025 ते दि. 22/09/2025 या कालावधीत हा उपक्रम शासनाने हाती घेतला आहे
उपरोक्त कालावधीत शिव/पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण करणे, ज्या पाणंद रस्त्यांची नोंद निस्तार पत्रक वाजिब उल अर्जामध्ये करण्यात आलेली नाही, त्याची नोंद घेण्याबाबत कार्यवाही करणे, शेतावर जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करुन देण्यासाठी संमती पत्र घेणे, रस्ता अदालत आयोजित करून शेतरस्त्यांचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, शेतरस्त्यांची मोजणी व सीमांकन करणे,गाव नकाशा अनुसार २७ रस्ते बंद आहेत एकूण ५६ रस्ते अतिक्रमित असून आतापर्यन्त ४ रस्ते खुले करण्यात आले असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.
आ) दुसरा टप्पा “सर्वांसाठी घरे दि. 23/09/2025 ते दि.27/09/2025 सर्वासाठी घरे उपक्रम राबविण्यात येणार आहे
या उपक्रमाअंतर्गत शासकीय जमीनीवरील 2011 पूर्वीचे निवासी अतिक्रमण नियमानुकूल करून अतिक्रमण नियमानुकूल केलेल्या लाभार्थ्यांना पट्टे वाटप करणे
इ) तिसरा टप्पा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणे दि.28/09/2025 ते दि. 02/10/2025 या कालावधीत राबविणायत येणार आहे
नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत भोगवटादार वर्ग 2 पुनर्वसन जमिनी भोगवटादार वर्ग 1 करणे महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान सेवा पंधरवडा अहिल्यानगर तालुक्यात मंत्री महसूल चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री जलसंपदा तथा पालकमंत्री अहिल्यानगर राधाकृष्ण विखे पाटील यांचे संकल्पनेतून व जिल्हाधिकारी पंकज आशिया, मा. उपविभागीय अधिकारी, अहिल्यानगर भाग, अहिल्यानगर सुधीर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली शासन निर्देशांन्वये राबविण्यात येत असून यात तालुक्यातील अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन तहसिलदार अहिल्यानगर संजय शिंदे यांनी केले आहे.
