Nagar Vidhansabha Election | आमदार जगताप हॅट्रिक करणार कि कळमकर जिंकणार
अजित पवार राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवार राष्ट्रवादी अशी दुरंगी लढत
नगर शहर विधानसभेच्या जागेसाठी अजित पवार राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवार राष्ट्रवादी अशी दुरंगी लढत होणार आहे हे तर निश्चित आहे मात्र यामध्ये अजित पवार राष्ट्रवादीतर्फे आमदार संग्राम जगताप तर शरद पवार राष्ट्रवादीतर्फे अभिषेक कळमकर या दोन्ही उमेदवारांनी प्रचार सभा,चौकसभा,कॉर्नर सभा भेटीगाठी आदींचा धडाका लावला आहे आणि शहरातील विविध भागात दोन्ही उमेदवारांना जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.
आमदार जगताप यांच्या बरोबर भाजप नेते अभय आगरकर,सुनील रामदासी,सचिन पारखी,महेंद्र गन्धे याबरोबरच शहर भाजप ज्येष्ठ आणि युवा नेते आणि सर्व महिला पदाधिकारी नेते आणि शिंदे सेनेचे पदाधिकारी आणि अजित पवार राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आणि पुढारी कार्यकर्ते सोबत आहेत आणि सर्वच भागात महायुतीचा प्रचार करण्यात व्यस्त आहेत त्यात नालेगाव येथे झालेल्या महायुतीच्या प्रचार रॅलीत उद्धव शिवसेनेचे गणेश कवडे हे सुद्धा आमदार जगताप यांच्यासोबत सहभागी झाले आणि धडधडतीत प्रचार केला.
कळमकर यांच्या सोबत शरद पवार राष्ट्रवादी, उद्धव सेना आणि काँग्रेसची नेते मंडळी आणि पदाधिकारी आहेत. अभिषेक कळमकर यांच्या सोबत खासदार निलेश लंके,काँग्रेसचे किरण काळे,उद्धव सेनेचे विक्रम राठोड,संभाजी कदम,बाळासाहेब बोराटे, शशिकांत गाडे,दिलीप सातपुते,भगवान फुलसौन्दर,योगी गाडे प्रचार रॅलीत सहभागी झाले आणि तुतारी विरुद्ध घड्याळ या रणसंग्रामाची सुरुवात झाली आहे.
ज्यावेळी लोकसभा निवडणुका लागल्या आणि निलेश लंके यांनी तुतारी घेऊन नगर दक्षिण पिंजून काढले त्यावेळी सुजय विखे यांचा पराभव करत नगर दक्षिण मध्ये तुतारीला चांगले वातावरण आहे हे सिद्ध केले परंतु घड्याळापेक्षा आमदार जगताप यांच्याकडे जनमत व त्यांनी केलेल्या कामांकडे पाहणारे नगरकरही आहेतच एकीकडे उमेदवारापेक्षा चिन्हाचे वजन जास्त अशी चर्चा असताना दुसरीकडे उमेदवार आणि चिन्ह दोन्ही दमदार अशीही चर्चा रंगली आहे अशा या चुरशीच्या लढतीत बाजी मारणार कोण ?
माजी खासदार सुजय विखे यांनी नुकतेच काल परवाच काही शिजत आले की कोणी पातेल्याला लाथ मारतो असे विधान एका प्रचारसभेत केले आणि आज शहर विधानसभेच्या प्रचारात आमदार संग्राम जगताप यांच्या सोबत प्रचार फेरी केली त्यांच्या उलथा पालथं होणारा पातेला नगरला आणून शहरातील शिजलेली खिचडी खराब करण्याचा काम होउ नये म्हणजे झालं. आमदार संग्राम जगताप यांनी मला नाही बोलावले तरी मी आलो आणि संग्राम जगताप यांना मताधिक्य मिळवून देण्यास प्रयत्नशील असल्याचं दावा सुजय विखेंनी केला खरा आणि मागील इतिहास पाहता शहरातून आमदार जगताप यांनी विखेंना मताधिक्य मिळवून दिलाच होता
हि गोष्ट वेगळी कि अल्पसंख्यांक समाजाबद्दल तेढ आणि द्वेष निर्माण करण्याची त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांना जड गेली आणि त्यांना नगर दक्षिणची जागा निवडून देऊ शकली नाही.यावरून हेही अधोरेखित होते कि नगरकर काय आणि एकूण महाराष्ट्र काय या ठिकाणी जात,धर्म,तेढ आणि द्वेष याला स्थान नाही. हिंदू-मुस्लिम आणि जातीपातीच्या राजकारणाला नगरकर आणि अस्सल महाराष्ट्रायीन जवळ करतच नाहीत. जनसामान्यांच्या चर्चेत अशीही चर्चा होती कि जर सुजय विखे अपक्ष असते तर मताधिक्याने निवडून आले असते असो लोकसभा तर गेली मात्र विधानसभेचा आखाडा चांगलाच तापलेला आहे.
महायुतीचा धर्म पाळण्यासाठी आणि मागील दोन अडीच वर्षात घट्ट झालेली आमदार संग्राम जगताप आणि सुजय विखेंची मैत्री यासाठी विखेंनी आमदार जगताप यांचा प्रचार केला आणि महायुतीच्या प्रचार फेरीत चांगलीच रंगत आली.
तथापि शहरातील वातावरण महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर आणि महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचार फेऱ्यांनी अगदी ढवळून निघाला आहे. एकीकडे तुतारी आणि दुसरीकडे घड्याळ भारी कोण मारेल बाजी याकडे लक्ष लागून आहेच महाराष्ट्रातील असे काही विधानसभा क्षेत्र आहेत की जिथे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले त्यात बारामतीची आणि नगरची लढत ही सामील आहे.
एकीकडे तुतारी आणि दुसरीकडे घड्याळ भारी कोण मारेल बाजी
बारामतीला अजित पवार राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार तुतारी घेऊन उभे आहेत तर नगरला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतर्फे मागील दोन टर्मचे आमदार संग्राम जगताप विरुद्ध शरद पवार राष्ट्रवादीच्या तुतारीवर अभिषेक कळमकर अशी दुरंगी लढत होत आहे. आमदार जगताप हॅट्रिक करणार कि कळमकर जिंकणार याबाबत अनेक तर्क वितर्क लढविले जात आहेत. एका प्रचार सभेत बोलताना अजित पावर यांनी म्हंटले कि लोकसभेला काकांना खुश केले तर विधानसभेला मला खुश करा! त्यांच्या या विधानाला जनता किती साथ देईल आणि महाराष्ट्रात शरद पवार यांची तुतारी वाजणार कि अजित पवार यांच्या घड्याळाचा गजर होणार हे लवकरच आपल्याला कळणार
महाराष्ट्रात शरद पवार यांची तुतारी वाजणार कि अजित पवार यांच्या घड्याळाचा गजर होणार?
संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अजित पवार राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवार राष्ट्रवादी अशा लढती होणार आहेत आणि महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यामध्ये मशाल विरुद्ध धनुष्यबाण ,घड्याळ विरुद्ध तुतारी कमळाला फायदा करून देतील कि पंजाचा नफा होईल हेही पुढील काळात स्पष्ट होईल.
शेख आदिल रियाझ
कार्य संपादक
9921998245