NCP Ahmednagar: राष्ट्रवादी काँग्रेस डॉ.अनिल आठरे यांचा शहर विधानसभेसाठी पहिला अर्ज

NCP Ahmednagar: राष्ट्रवादी काँग्रेस  डॉ.अनिल आठरे  यांचा शहर विधानसभेसाठी पहिला अर्ज

NCP Ahmednagar: राष्ट्रवादी काँग्रेस  डॉ.अनिल आठरे  यांचा शहर विधानसभेसाठी पहिला अर्ज

अहमदनगर : दर्शक । 

          राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणूक पक्षाकडून लढविणाऱयांचे अर्ज मागविण्यात येत आहे त्यासाठी फॉर्म देण्यास सुरुवात झाली असून शहर विधानसभेसाठी पहिला अर्ज जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्याकडून इच्छुक उमेदवार डॉ अनिल आठरे यांनी घेतला यावेळी राजेश भाटिया ,उमेश उपाध्ये व कार्यकर्ते उपस्थित होते 

      दिवाळी नंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीची चर्चा सुरु झाली आहे.महाविकास आघाडीकडून  नगरची जागा हि शिवसेना उबाठा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या दोघांपैकी एकाला मिळणार आहे, त्यादृष्टीने पक्ष तयारी करत आहेत, व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आले आहे , यापूर्वी काँग्रेसने पण अर्ज भरून घेतले आहे ,

        राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून अहमदनगर शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील सुप्रसिद्ध असणारे डॉ.अनिल आठरे  यांना निवडणूक लढवणार का ? असे ३ महिन्यापूर्वी  विचारण्यात आले व त्यांनी होकार दिला. तशी मागणी नवीन चेहरा म्हणून अनेकांनी पक्षाकडे केली होती, त्यांनी बारामती येथे जाऊन पक्ष प्रमुख शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली व त्यांनी तयारी करण्याची सूचना डॉ आठरे याना केली आहे. 

           राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांच्या त्यांनी भेटी घेण्यास ३ महिण्यापासून सुरवात केली आहे, शहरातील अनेकांनीही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून येत्या विधानसभा निवडणुकीत डॉ.अनिल आठरे यांना उमेदवारी द्यावी, अशीही मागणी केली आहे. यामुळे अहमदनगर शहरातील राजकारणात आता नव्याने विधानसभेसाठी डॉ.अनिल आठरे यांचीही नावाची चर्चा जोरात सुरु झाली आहे.