Wednesday, November 19, 2025
HomeAhmednagarNCP News | राष्ट्रवादीत मोठी कारवाई! रुपाली ठोंबरे यांची प्रवक्तेपदावरून उचलबांगडी

NCP News | राष्ट्रवादीत मोठी कारवाई! रुपाली ठोंबरे यांची प्रवक्तेपदावरून उचलबांगडी

 राष्ट्रवादीत मोठा धक्का! रुपाली ठोंबरे यांची प्रवक्तेपदावरून उचलबांगडी

NCP News | राष्ट्रवादीत मोठी कारवाई! रुपाली ठोंबरे यांची प्रवक्तेपदावरून उचलबांगडी

 

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर केलेल्या टीकेचं ओझं आता स्वतः रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर आलं आहे.अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर मोठी कारवाई करत प्रवक्ते पदावरून हकालपट्टी केली आहे.

पक्षाने काही दिवसांपूर्वी ठोंबरे पाटील यांना स्पष्टीकरणाची नोटीस दिली होती, पण त्यांचा खुलासा येण्यापूर्वीच निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे पक्षातील वातावरण चांगलंच तापलं आहे .

राष्ट्रवादीची नवी प्रवक्त्यांची यादी जाहीर

नव्या 17 प्रवक्त्यांच्या यादीत ठोंबरे पाटील, आमदार अमोल मिटकरी आणि वैशाली नागवडे यांची नावे गायब आहेत. या तिघांची प्रवक्तेपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.

त्याऐवजी हेमलता पाटील आणि प्रतिभा शिंदे यांच्यावर नव्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.

नव्या प्रवक्त्यांमध्ये हे नवे चेहरे:

अनिल पाटील, चेतन तुपे, सना मलिक, हेमलता पाटील, राजीव साबळे, सायली दळवी, रुपाली चाकणकर, आनंद परांजपे, राजलक्ष्मी भोसले, प्रतिभा शिंदे, प्रशांत पवार, शशिकांत तरंगे, ब्रिजमोहन श्रीवास्तव, अविनाश आदिक, सुरज चव्हाण, विकास पासलकर आणि श्याम सनेर.

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, “आधीच्या सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत.”

रुपाली ठोंबरे पाटील यांनी याआधी “पक्षाने मला नोटीस नाही, फक्त खुलासा पत्र दिलं होतं” असा खुलासा केला होता. पण दोनच दिवसांत पक्षाकडून झालेल्या या कारवाईमुळे ठोंबरे पाटील यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का ठरला आहे .आता त्या पुढे कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे 

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments