
नेप्तीत ईद-ए-मिलाद उत्साहात, मिरवणूक,विश्वशांतीसाठी प्रार्थना व प्रसादाचे वाटप हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन
Nepti : नगर : दर्शक |
नगर तालुक्यातील नेप्ती येथे गणपती उत्सवानंतर पोलीस प्रशासनाच्या आवाहनानंतर नाले हैदर यंग पार्टी व मुस्लिम बांधवांनी सोमवारी संपूर्ण जगाला शांतीचा आणि एकतेचा संदेश देणारे मुस्लिम धर्मियांचे धर्मगुरू हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती विविध कार्यक्रमाने उत्साहात साजरी केली. यावेळी मुस्लिम बांधवांना हिंदू बांधवांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या अशी माहिती रामदास फुले यांनी दिली.
ईद-ए-मिलाद निमित्त गावातील हिंदू-मुस्लिम लोकांनी एकत्रित येऊन धार्मिक एकतेचे दर्शन घडविले. कार्यक्रम परिसरात इमामबाडा येथे हिंदू-मुस्लिम बांधवांच्या वतीने स्वच्छता अभियान राबवून कार्यक्रम परिसर स्वच्छ व सुंदर केला. परिसरात झालर व पताका लावून आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. यावेळी हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन घडत होते. गावातील धार्मिक वातावरण ईदमय झाले होते. हा दिवस मुस्लिम बांधवांसाठी अतिशय खास आहे कारण या दिवशी इस्लाम धर्मियांचे सर्वात लोकप्रिय संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्म झाला आहे. इस्लामच्या धोरणानुसार अल्लाहाकडे कुराण हा धर्मग्रंथ त्यांच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचला आहे.
गावातील चौका-चौकात ग्रामस्थांनी मिरवणुकीचे स्वागत केले
ईद-ए-मिलाद निमित्त नाले हैदर यंग पार्टी व मुस्लिम बांधवांच्या वतीने इमामबाडा येथून गावातून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत हिंदू-मुस्लिम युवकांनी धार्मिक ध्वज, पताका हातात घेत “जश्ने ईद मिलादुन्नवी जिंदाबाद”, “अल्लाहू अकबर” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. गावातील चौका-चौकात ग्रामस्थांनी मिरवणुकीचे स्वागत केले. अतिशय उत्साही वातावरणात शांततेत मिरवणूक गावातून फिरून आल्यानंतर इमामबाडा येथे मिरवणुकीची सांगता झाली. यावेळी मुस्लिम बांधवांना हिंदू बांधवांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या. ग्रामस्थांमध्ये प्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी मौलाना मुनीर सय्यद यांनी देशाच्या विकासासाठी व शांततेसाठी प्रार्थना केली. माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण होळकर, सरपंच संजय जपकर, माजी उपसरपंच संजय आसाराम जपकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शिवाजीराव होळकर यांनी कार्यक्रम स्थळी येऊन मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी उपसरपंच फारूक सय्यद, दादू चौगुले, बाबूलाल सय्यद, समता परिषद तालुकाध्यक्ष रामदास फुले, मार्केट कमिटीचे माजी संचालक वसंतराव पवार, प्रा. एकनाथ होले, मौलाना मुनीर सय्यद, अरबाज शेख, ग्रामपंचायत सदस्य बंडू जपकर, हुसेन सय्यद,
व्हा. चेअरमन सादिक पवार, गुलाब सय्यद, नितीन पवार, बबन सय्यद, जावेद सय्यद, जमीर सय्यद, मेहबूब सय्यद, सादिक सय्यद, वाजीद सय्यद, मुक्तार सय्यद, नौशाद शेख, सिकंदर शेख, सलीम सय्यद, युनूस सय्यद, हन्सार सय्यद, कयूम सय्यद, उमर सय्यद, नावेद सय्यद, रमिज सय्यद, आदिल सय्यद,
परवेज सय्यद, बादशाह सय्यद, रफिक सय्यद, मोईन सय्यद, आसिफ सय्यद, आसिफ शेख, एजाज सय्यद, हमीद सय्यद, नसीर सय्यद, अजर सय्यद, दानिश सय्यद आदींसह नाले हैदर यंग पार्टी, दोस्ती तरुण मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ,मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
