न्यू आर्ट्सच्या एम.एस्सी.च्या विद्यार्थ्यांनींचे आंतरराष्ट्रीय संस्थेत ‘रसायनशास्र समर स्कूल’ प्रशिक्षण पूर्ण
अहमदनगर (प्रतिनिधी) – इंडियन इन्स्टिटट्युट ऑफ टेक्नोलॉजी, मुंबई या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था दरवर्षी संपूर्ण भारतातून एम. एस्सी रसायनशास्त्र विषयातील प्रथम वर्षामधे उत्कृष्ट गुणवत्ता प्राप्त केलेल्या विविध महाविद्यालयातील 24 विद्यार्थ्यांची ‘रसायनशास्र समर स्कूल’ साठी निवड करत असते. यावर्षी न्यू आर्टस्, कॉामर्स अॅण्ड सायन्स कॉलेजमधील कु.ऋतुजा घोरपडे आणि कु. मयुरी नालकुल या विद्यार्थींनींची निवड झाली होती. त्यांनी हे प्रशिक्षण नुकतेच पूर्ण केले.
या विद्यार्थ्यांना रसायनशास्र संशोधनातील नाविण्यपूर्ण विषय आणि विविध संसाधने यांचे प्रशिक्षण दिले जाते. या विद्यार्थ्यांना प्रो.डॉ. प्रदिप कुमार, प्रो. डॉ. संतोष घारपुरे आणि प्रो. डॉ.सुवर्ण कुलकर्णी यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले. या विद्यार्थीनींचा संपूर्ण खर्च व राहण्यास सोयही आयआयटीच करते.
ऑक्टोबर 2024 मध्ये आय.आय.टी.च्या शास्रज्ञांच्या सहकार्याने आपल्या महाविद्यालयातील रसायनशास्र विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय कार्यशाळा घेतली जाणार आहे. समर स्कूलमधे सहभागी होण्याची संधी पारनेर महाविद्यालयाच्या 2 विद्यार्थ्यांना मे-जून 2016 पासूनच दरवर्षी मिळत आहे. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्था तळागाळातील विद्यार्थ्याप्रती जोपासत असलेल्या बांधिलकीचा हा सन्मानच आहे. पुणे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील फक्त तीन महाविद्यालयांना ही संधी मिळत आहे. अशा प्रकारची संधी न्यू आर्टस् अहमदनगरच्या विद्यार्थ्यांना प्रथमच मिळत असल्याबद्ल विशेष आनंद व्यक्त केला जात असल्याचे उपप्राचार्य डॉ. दिलीप ठुबे यांनी सांगितले.
या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, उपाध्यक्ष डॉ.विवेक भापकर, सचिव अॅड.विश्वासराव आठरे, सहसचिव जयंत वाघ, खजिनदार अॅड.दीपलक्ष्मी म्हसे, विश्वस्त मंडळ तसेच प्र.प्राचार्य डॉ.बी.बी. सागडे, उप्राचार्य डॉ. संजय कळमकर व प्रबंधक बी.के. साबळे यांनी विद्यार्थिनींचे व मार्गदर्शक विभागप्रमुख व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर सेवकांचे अभिनंदन करुन विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या.