PA Inamdar School Nagar | पी.ए.इनामदार शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

PA Inamdar School Nagar | नगर : दर्शक । – गोविंदपुरा येथील पी.ए. इनामदार इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या प्रार्थना गीताने झाली. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. मरियम माजीद यांनी ध्वजारोहण केले.
यावेळी संस्थेचे चेअरमन अब्दुल रहीम खोकर, डॉ. खालीद शेख, इंजि. इकबाल सैय्यद, विकार काजी, शब्बीर मोहम्मद, प्राचार्य युनुस सलीम,उपप्राचार्या फरहाना शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रगीतानंतर स्काउट्स अँड गाईड्सच्या मुलांनी परेडचे आयोजन केले. त्यानंतर मुलांनी स्वतंत्र सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. डॉ. मरियम माजीद यांनी सर्व मुलांना आणि शिक्षकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि सांगितले की, अनेक महान लोकांच्या बलिदानातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. त्याचे रक्षण करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.
हा दिवस प्रत्येकाने धार्मिक उत्सवाप्रमाणे आनंदाने आणि उत्साहाने साजरा करावा. मुलांमध्ये देशभक्ती आणि मातृभूमीवरील प्रेमाची भावना निर्माण झाली पाहिजे. त्यांनी देशसेवेसाठी नेहमीच तत्पर असले पाहिजे यावर त्यांनी भर दिला. समाजातील भ्रष्टाचार आणि मुलींवरील अत्याचारांना विरोध करून ते उपटून टाकले पाहिजे. हे काम तेव्हा शक्य आहे जेव्हा समाजातील प्रत्येक सदस्य त्यासाठी जागृत असेल,असे सांगितले.
