
Prabhag Rachna Nagar | अंतिम प्रभाग रचनेवर ठाकरे शिवसेनेची प्रतिक्रिया
नगर : दर्शक । दिनांक : 20 ऑक्टोबर 2025
मनपा सावित्री सार्वत्रिक निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे. त्यावर ठाकरे शिवसेनेच्या वतीने प्रतिक्रिया व्यक्त करताना शहर प्रमुख किरण काळे म्हणाले, केवळ प्रभाग क्रमांक ९, १५, १६ मध्ये बदल करण्यात आले आहेत.
सर्व प्रभागांमध्ये मिळून गंभीर स्वरूपाच्या ४३ हरकती असताना देखील एकच हरकत अंशतः मान्य केली गेली. तीही सत्ताधारी महायुतीच्या दबावतून केली गेली. ठाकरे सेनेने घेतलेल्या सर्वच्या सर्व तेरा हरकती फेटाळण्यात आल्या आहेत. नदी, नाले, ओढे, मुख्य रस्ते, फ्लाय ओव्हर यामधील भौगोलिक सलगता तोडून, मोडून
सत्ताधाऱ्यांच्या राजकीय फायद्यासाठीची केलेली रचना मात्र महायुतीच्या दबावातून तशीच ठेवली गेली. विलंबाची कोणतीही कारणं दिली नाही. आयोगाने नगर विकास कडे मागवलेल्या अहवाला बद्दल देखील कोणतेही भाष्य केले गेले नाही. पराभवाच्या धास्तीने भयभीत महायुतीने आयोगाच्या माध्यमातून
निवडणूक प्रक्रिया मॅनेज केली असल्याचा गंभीर आरोप काळे यांनी केला आहे. त्यामुळे ही तर सत्ताधारी महायुतीच्या राजकीय हस्तक्षेपाची कबुली असल्याचे ठाकरे सेनेने म्हटले आहे.
