Ganapati-making workshop | बडीसाजन ओसवाल युवक संघ व नगर जल्लोष (ट्रस्ट) यांच्या संयुक्त विद्यमाने 24 ऑगस्टला गणपती बनवा कार्यशाळा…!!

Ganapati-making workshop | नगर : दर्शक । – बडीसाजन ओसवाल युवक संघ आणि नगर जल्लोष (ट्रस्ट) यांच्या संयुक्त विद्यमाने, प्रसिद्ध शिल्पकार बालाजी वल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने, शाडूमातीपासून गणपती बाप्पाची मूर्ती बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.ही कार्यशाळा रविवार, 24 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11.30 ते 1.30 या वेळेत बडीसाजन ओसवाल भवन, आनंद ऋषी हॉस्पिटल शेजारी, स्टेशन रोड, नगर येथे होणार आहे.यात बालघर मधील मुलं ही सहभागी होणार आहेत.
या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी प्रवेश फी 100 रुपये असून, नोंदणी आवश्यक आहे. कार्यशाळेत मूर्ती बनवण्यासाठी लागणारी शाडू माती आयोजकांकडून मोफत दिली जाईल. सहभागी होणार्यांनी मूर्ती बनवण्यासाठी छोटा पाट, रुमाल आणि पाण्याची बॉटल सोबत आणणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क सागर बोगा 9860612045, धीरज लोढा 9028684744, दिपक गुंडू 9922140120 , रोहित चुत्तर 8408853555
या उपक्रमाला रेडिओ सिटी (91.1 एफएम) आणि जागरण इनिशिएटिव्हचे रेडियो पार्टनर म्हणून सहकार्य लाभले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यशाळेत सहभागी होऊन पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश सर्वत्र पोहोचवावा, असे आवाहन ही नगर जल्लोष संस्थेचे उपाध्यक्ष श्री.गुंजन शिंगवी यांनी केले आहे.
