Wednesday, November 19, 2025
HomePunePune News | बालदिनानिमित्त विशेष मुलांसाठी क्रीडा व कला उपक्रम; साहित्य वितरणाचाही...

Pune News | बालदिनानिमित्त विशेष मुलांसाठी क्रीडा व कला उपक्रम; साहित्य वितरणाचाही समावेश

 Pune News | बालदिनानिमित्त विशेष मुलांसाठी क्रीडा व कला उपक्रम; साहित्य वितरणाचाही समावेश

Pune News | बालदिनानिमित्त विशेष मुलांसाठी क्रीडा व कला उपक्रम; साहित्य वितरणाचाही समावेश

विशेष मुलांसाठी अभिनव कार्यक्रमाचे आयोजन

Pune News | पुणे : बालदिनानिमित्त क्रिएटिव्ह फाउंडेशन पुणे आणि ग्लोबल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे मनपा शाळा क्रमांक 14-B, शिवाजीनगर येथील विशेष मुलांसाठी एक अनोखा आणि आनंददायी उपक्रम आयोजित करण्यात आला. विशेष मुलांसोबत विविध खेळ, कला-साहित्य वितरण आणि संवादाद्वारे हा दिवस संस्मरणीय बनवण्यात आला.


नवीन पिढीत सामाजिक संवेदना निर्माण करण्याचा प्रयत्न

“आमच्या मुलांमध्ये समाजसेवेची आवड जागृत व्हावी आणि वंचित घटकांप्रती कर्तव्यभावना वाढावी, यासाठी आम्ही त्यांना असे उपक्रम प्रत्यक्ष अनुभवायला देतो,” असे ग्लोबल ग्रुपचे संचालक मनोज हिंगोरानी आणि संजीव अरोरा यांनी सांगितले.

“आपल्याकडे असलेली जास्तीची साधने वंचित आणि दुर्लक्षित घटकांपर्यंत पोहोचावीत, म्हणून क्रिएटिव्ह फाउंडेशन सातत्याने प्रयत्नशील आहे,” असे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी स्पष्ट केले.


विशेष मुलांसोबत खेळ, मनोरंजन आणि प्रोत्साहन

रिद्धी हिंगोरानी, भाविका हिंगोरानी, निकिता अरोरा तसेच ग्लोबल ग्रुपच्या एचआर उपाध्यक्ष जयश्री राव आणि त्यांची टीम — अल्तमश इनामदार, रेखा भोसले — यांनी मुलांसोबत संगीत खुर्ची, पासिंग बॉल, बाऊची यांसह अनेक खेळ खेळले. दिव्यांग असूनही मुलांनी उत्साहाने सहभागी होत पारितोषिके पटकावली.

मुलांनी कसरतींचे, प्रार्थनेचे आणि राष्ट्रगीताचे सुंदर सादरीकरण करून उपस्थितांचे मन जिंकले. तसेच “भारत माता की जय”, “जय भवानी जय शिवाजी”, “वंदे मातरम” अशा घोषणा देत उत्साह उंचावला.


भावनिक क्षणांनी परिपूर्ण बालदिन

“या मुलांसोबत घालवलेले क्षण अविस्मरणीय आहेत. यापुढेही राष्ट्रीय दिवस, सण, वाढदिवस यांसारख्या प्रसंगी विविध शाळांमध्ये असेच कार्यक्रम आयोजित करण्याचा आमचा मानस आहे,” असे रिद्धी, भाविका आणि निकिता यांनी सांगितले. मुलांचे प्रेम पाहून या तिघींच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

ग्लोबल ग्रुपची ही उपक्रमशीलता आनंददायी असल्याचे जयश्री राव यांनी नमूद केले. “फक्त भेटवस्तू देऊन उपयोग नाही; या मुलांसोबत वेळ घालवणे हीच खरी मदत आहे,” असे संदीप खर्डेकर यांनीही म्हटले.


खेळ, कला आणि शैक्षणिक साहित्याचे वितरण

कार्यक्रमात विशेष मुलांना खालील साहित्य वाटप करण्यात आले:

  • फुटबॉल

  • कॅरम बोर्ड

  • बॅडमिंटन सेट

  • रिंग गेम सेट

  • आर्ट-क्राफ्ट व रंगकाम पुस्तके

  • चित्रकला वही

  • रंग, ब्रश

  • एक रेघी, दोन रेघी, चार रेघी, चौकोनी वह्या

  • पेन्सिल-खोडरबर सेट

  • व्हॉलीबॉल आणि इतर क्रीडा साहित्य

मुलांसोबत खाऊ खाताना सर्वांच्या चेहऱ्यावर खऱ्या अर्थाने बालदिन साजरा केल्याचे समाधान झळकत होते.


शाळेच्या टीमचे सहकार्य उल्लेखनीय

हा उपक्रम मुख्याध्यापक सौ. वर्षा संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी शिक्षक निलेश मिरगणे, शिक्षिका प्रियांका मोरे, सेवक माऊली सुरत, सेविका बेबी बोरकर, सेविका गौरी कांबळे, सुरक्षा रक्षक स्वामी शिवशरण यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन करून मोलाचे सहकार्य केले.

क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि ग्लोबल ग्रुपतर्फे त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments