Rahuri | पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, पक्ष फोडायला अक्कल लागत नाही : शरद पवार

 आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ वांबोरी येथे जाहीर सभा

Rahuri | पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, पक्ष फोडायला अक्कल लागत नाही : शरद पवार






राहुरी : 

फोडाफोडीमुळे लोकसभेत भाजपला जनतेने नाकारले आहे. तीच जनता विधानसभेतही त्यांना नाकारेल आणि राज्यात सत्तांतर होईल. प्राजक्त तनपुरे यांना आमदार करण्याची जबाबदारी राहुरीकरांनी घ्यावी त्यांना कॅबिनेटमध्ये स्थान देण्याची जबाबदारी माझी राहील अशी ग्वाही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची बुधवारी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे प्रचारसभा पार पडली. यावेळी शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, पक्ष फोडायला अक्कल लागत नाही, अशा शब्दांत शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला लगावला. यावेळी त्यांनी आमदार प्राजक्त तणपुरे यांचंदेखील कौतुक केलं. 

पक्ष निर्माण करायला अक्कल लागते. फोडायला लागत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ३०-४० आमदार गोळा केले. गुवाहाटीला जाऊन बसले. ही एक व्यक्ती देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होती. उद्धव ठाकरेंच्या मंत्रीमंडळात होती. असं असतानाही त्यांनी पक्ष फोडण्याची भूमिका घेतली. लोकांना हे पटलं नाही. देवेंद्र फडणवीसांनी सगळ्यात मोठं काम काय केलं? विचारल्यानंतर पक्ष फोडला म्हणून सांगतात. पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, पक्ष फोडायला अक्कल लागत नाही, असा घणाघात शरद पवारांनी आपल्या भाषणात केला.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी राहुरीला आलो होतो. तुम्ही आपला उमेदवार निवडून दिला त्याबद्दल तुमचे आभार. मागच्यावेळी काँग्रेसचा एक आणि आमचे चार खासदार होते. मात्र घटना धोयात असल्याने तुम्ही आमचे ३१ खासदार निवडून दिले. आता भाजप आणि आमच्यातल्या फुटून गेलेल्या लोकांचे राज्य आहे. उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवारांसह अनेकजण मंत्री होते. मात्र शिंदेंनी काही लोक घेतले आणि गुहाटीला जाऊन बसले. उद्धव ठाकरेंचे सरकार पाडले. पक्ष फोडून सत्ता मिळवणे ही लोकशाही आहे का? पक्ष फोडल्याचे देवेंद्र फडणवीस स्वतः म्हणाले. पक्ष उभा करायला अक्कल लागते. मात्र फोडायला अक्कल लागत नाही, असा पुनरुच्चार शरद पवार यांनी केला.