Wednesday, November 19, 2025
HomeAhmednagarNivedan | पत्रकार बाळासाहेब आगे यांना धमकी देणाऱ्याचा शोध सुरु : पोलिस...

Nivedan | पत्रकार बाळासाहेब आगे यांना धमकी देणाऱ्याचा शोध सुरु : पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे

Nivedan | पत्रकार बाळासाहेब आगे यांना धमकाविणाऱ्यावर कठोर कारवाईचे नगर शहर पत्रकारांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

 

 

नगर : दर्शक ।

श्रीरामपुर येथील ज्येष्ठ पत्रकार व दै.जयबाबाचे संपादक बाळासाहेब शंकरराव आगे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करावी आणि त्यांना पोलिस संरक्षण द्यावे अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेच्या पदाधिकारी व शहरातील पत्रकारांनी पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांना निवेदन देऊन केली. दरम्यान या आरोपीबाबत हा गुन्हेगार वृत्तीचाच असून त्याला पकडण्यासाठी पोलिस शोध घेत आहेत या आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल असे पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.

 

श्रीरामपुर येथील ज्येष्ठ पत्रकार व दै. जयबाबाचे संपादक बाळासाहेब शंकरराव आगे यांना विरोधात बातमी प्रकाशित केल्याच्या कारणावरुन एकाने सोशल मिडीयावर जीवे मारण्याची धमकी दिली. त्या पार्श्वभूमीवर नगर येथे मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, संजयकुमार पाठक, अन्सार सय्य्द, गिरीष रासकर, अमित आवारी, प्रल्हाद एडके, प्रसाद शिंदे, आदील शेख, रविंद्र कदम, गोरख शिंदे, नावेद शेख यांच्यासह पत्रकारांनी पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांना निवेदन देऊन आरोपीवर कारवाईची मागणी केली.

 

 

निवेदनात म्हटले आहे की, श्रीरामपुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत नशेच्या इंजेक्शनसह महिला अटक झाल्याची बातमी व श्रीरामपुर येथील पोलिस उपाधिक्षक यांचा माहिती देेणारा व्हिडिओ प्रकाशीत केला. त्यात गणेश मुंडे याचे नाव आले. त्यानंतर सबंधित व्यक्तीने श्रीरामपुर (जि.अहिल्यानगर) येथून प्रकाशीत होणाऱ्या दैनिक जयबाबा या दैनिकात चे संपादक व ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब आगे यांना इन्टाग्रामवरुन धमकी देत हे वृत्त डिलीट कर अन्यथा तुला डीलीट करुन टाकील असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली.

 

 

सबंधित व्यक्तीपासून आगे यांना तसेच पत्रकारांना धोका आहे. सामाजिक स्थितीवर लेखन करणाऱ्या तसेच पोलिसांनी दिलेली माहीती प्रकाशीत केली म्हणून जर मारुन टाकण्याची धमकी येत असेल तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे पोलिसांनी सबंधित व्यक्तीला तातडीने अटक करुन त्याच्यावर कठोर कारवाई करावी व बाळासाहेब आगे यांना संरक्षण द्यावे. आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत. गुन्हे अन्वेषन विभागालाही त्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्याला लवकर पकडले जाईल आणि कठोर कारवाई केली जाईल असे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आश्वासित केले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments