Rocky Aur Rani Ki Prem Kahani:’रॉकी और रानी की प्रेम कहानी’ ची रिलीज डेट जाहीर
Rocky Aur Rani Ki Prem Kahani: रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत
फिल्ममेकर करण जोहरच्या या चित्रपटाची रिलीज डेट आज जाहीर करण्यात आली आहे. करण जोहर,
आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांनी सोशल मीडियावर ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचं
पोस्टर शेअर करुन या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमधील रणवीर
आणि आलिया यांच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
चित्रपट कधी रिलीज होणार ?
आज करण जोहरचा बर्थ-डे आहे. त्यामुळे करणनं त्याच्या वाढदिवसाला ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. हा चित्रपट 28 जुलै 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
रणवीर हा फंकी लूकमध्ये दिसत आहे
सोशल मीडियावर करणनं ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटामधील कलाकारांचा लूक शेअर केला आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातील रॉकीच्या म्हणजेच रणवीरच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाच्या पोस्टरमधील रणवीर हा फंकी लूकमध्ये दिसत आहे.