
Rotary Club | नगर : दर्शक –
Rotary Club | रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलतर्फे आणखी एक उपक्रम राबविण्यात आला असून 500 लिटर हॉट वॉटर सोलर सिस्टम ही सुविधा श्री संत गाडगे महाराज प्राथमिक आश्रमशाळा, भानस हिवरे, नेवासा फाटा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर येथे देण्यात आली आहे.
या प्रसंगी क्लबचे अध्यक्ष रोटेरियन सुनील कटारिया, सचिव रोटेरियन अमर गुरप, रोटेरियन सुनील मुथा, रोटेरियन संजय मुनोत, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक नितीन कांबळे, शिक्षक मच्छिंद्र घुंमे, श्रीमती वर्षा गायकवाड, कुमारी विद्या कर्णिक तसेच इतर शालेय कर्मचारी उपस्थित होते.
रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलतर्फे नेहमीच शिक्षण, पर्यावरण, आरोग्य, महिला सक्षमीकरण तसेच समाजातील गरजूंसाठी उपयुक्त असे विविध उपक्रम राबविले जातात. या कार्यामागे क्लबची प्रमुख संकल्पना “Unite for Good” आहे.असे मान्यवरांनी नमुद केले.
